Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खारभूमी योजना शासनास हस्तांतरित करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे विजय वडेट्टीवारांचे निर्देश

January 13, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
खारभूमि विकासाबाबत बैठक 1

मुक्तपीठ टीम

कोकणातील ६४ खाजगी खारभूमी योजना पूर्ण झालेल्या आहेत या योजना शासनास हस्तांतरित करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश खार जमिनी विकास, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

            

खार जमिनी विकास विभागातील कामांच्या अनुषंगाने मंत्रालयातील दालनात दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित बैठकीत  खार जमिनी विकास, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.यावेळी आमदार जयंत पाटील जलसंपदा विभागाचे कोकण प्रदेशचे मुख्य अभियंता विजय गोगाटे, खारभूमी विकास महामंडळचे प्रकल्प संचालक तथा अधिक्षक अभियंता श्री.काठेकोरी  तसेच खारभूमी विकासचे इतर अधिकारी उपस्थित होते.

            

खार जमिनी विकास मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,कोकणातील  पाच जिल्ह्यातील ६४ खाजगी खारभूमी योजना पूर्ण झालेल्या आहेत या योजनांमुळे १५ हजार एकर क्षेत्र सुपिक होणार आहे. खारभूमी योजना शासनाला हस्तांतरित करण्यासाठी  मंत्रीमंडळासमोर हा प्रस्ताव सादर होणे आवश्यक आहे यासाठी विभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी .मागील चार वर्षात बांधकामाच्या खर्चात व दरात झालेली वाढ लक्षात घेता ब-याच योजना या प्रचलित आर्थिक मापदंडात बसत नाहीत यासाठी मापदंड सुधारित करण्यासाठीच्या प्रस्तावावरही कार्यवाही  करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. अशा सूचना मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी दिल्या.

           

विजय वडेट्टीवार म्हणाले, खारभूमी विकास कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे कामांवर परिणाम होत आहे.जलसंपदा विभागाने खार भूमी विकास कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही करून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.रोहा,मुरूड व अलिबाग तालुक्यातील  खारभूमी योजनांच्या नूतनीकरणाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. कायमस्वरूपी या योजनांच्या विकासासाठी कशा प्रकारे तरतूद करता येईल याची  मदत व पुनर्वसन विभागाकडूनही पडताळणी करण्यात येईल, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

            

आमदार जयंत पाटील म्हणाले, रायगड जिल्ह्यातील खारभूमी योजनांचे अतिवृष्टी,तोक्ते यासारख्या चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या योजनांची बांधकामे पूर्ण होवून सुमारे १५ ते २० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. बांधाना असणा-या उघाड्या जीर्ण झाल्यामुळे भरतीचे पाणी लाभक्षेत्रात जाऊन शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, पिकांचे,मालमत्तांचे नुकसान होत असून पिण्याचे पाणी देखील खारे होत आहे तरी शहाबाज खारभूमी योजना,घेरंड,मनोरंजन खारभूमी योजना,धाकटपाडा शहापूर खारभूमी योजना, धोंडखोर खारभूमी योजना,करंजवीरा खारभूमी योजना यांचे नूतनीकरण करून या योजनांचा कायमस्वरूपी विकास करावा अशी मागणी श्री.पाटील यांनी केली.


Tags: KharBhoomi Schemekokanvijay wadettiwarकोकणखारभूमी योजनाविजय वडेट्टीवार
Previous Post

देशाच्या सीमेवर मोबाइल रेंजच नाही! राजकारण्यांकडून उत्तराखंडमध्ये ऑनलाईन प्रचारासाठी नेपाळी नेटवर्कचा वापर!

Next Post

कोरोनाग्रस्त परिवारापर्यंत कल्याणकारी योजनांचे लाभ पोहोचवण्याच्या डॉ. नीलम गोऱ्हेंच्या सूचना

Next Post
Neelam Gorhe Suggestions on benefits of welfare schemes to corona affected people

कोरोनाग्रस्त परिवारापर्यंत कल्याणकारी योजनांचे लाभ पोहोचवण्याच्या डॉ. नीलम गोऱ्हेंच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!