Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाग्रस्त परिवारापर्यंत कल्याणकारी योजनांचे लाभ पोहोचवण्याच्या डॉ. नीलम गोऱ्हेंच्या सूचना

January 13, 2022
in घडलं-बिघडलं
0
Neelam Gorhe Suggestions on benefits of welfare schemes to corona affected people

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी समन्वय साधून कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी व कोरोनाग्रस्त परिवारापर्यंत लाभ पोहचवावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

            

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे, नाशिक, धुळे, जालना, जळगाव, पालघर जिल्ह्यात दौरे केले होते. त्यावेळी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी विविध सूचना दिल्या.

            

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, कोरोनामुळे निराधार झालेल्या महिला आणि बालकांची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व्हेक्षण करावे. निराधार झालेल्या महिला आणि मुला – मुलींना विविध योजनांद्वारे मदत देण्याच्या काम प्रगतीपथावर आहे हे समाधानकारक आहे परंतु सर्व लाभधारकांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट ठेवावे .

            

बालविवाह रोखण्यासाठी पोलीस विभागाने विशेष लक्ष द्यावे. अपहरण झालेल्या किंवा घरातून निघून गेलेल्या मुलींच्या शोधासाठी आणि परत आलेल्या मुलींचे समुपदेशन करण्यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करावे. पोलीसांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, दक्षता समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या.

            

कोरोना कालावधीत कामगार, बांधकाम मजूर, रिक्षा चालक यांना मदत देण्यासाठी संबंधित विभागांनी योजनांची अंमलबजावणी करावी. याबाबत डाटाबेस तयार करावा. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांची सुरुवात करावी. या योजनेतून पाणंद रस्ते रुंदीकरण यासारखी कामे हाती घ्यावीत, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

            

महिला बचतगटांना मदत होईल, अशा पध्दतीने काम करावे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महिला बचतगटांच्या माध्यमातून जाणीव जागृती करावी, अशी सूचनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांचे विशेष अभिनंदन            

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कोरोना सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेल्या उपक्रमांचे विशेष अभिनंदन केले. डॉ. देशमुख यांनी कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी विशेष महिला पोलीस पथक नियुक्त केले होते. या पथकाने जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरना भेट देऊन महिला रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न केले होते. याचा चांगला उपयोग झाला होता.

            

बैठकीस पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, जालना जिल्हाधिकारी विजय राठोड, जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जळगाव महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, पुणे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, धुळे निवासी उपजिल्हाधिकारी संजय राठोड, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली.


Tags: Dr.Neelam Gorhewelfare schemeकल्याणकारी योजनाडॉ.नीलम गोऱ्हे
Previous Post

खारभूमी योजना शासनास हस्तांतरित करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे विजय वडेट्टीवारांचे निर्देश

Next Post

एमबीए व्हायचंय? AICTEच्या मान्यतेने IGNOUच्या व्हर्च्युअल कोर्सचा नवा मार्ग

Next Post
IGNOU

एमबीए व्हायचंय? AICTEच्या मान्यतेने IGNOUच्या व्हर्च्युअल कोर्सचा नवा मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!