Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयात ११ जुलैला फरार विजय मल्ल्याच्या शिक्षेचाही निकाल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Vijay MAllya

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील प्रकरणांवर सोमवारी ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष तिथं लागलेलं आहे. त्याचवेळी गेलं दशकभर देशात गाजत असलेल्या फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या अवमान प्रकरणातील शिक्षेवर सर्वोच्च न्यायालय ११ जुलै रोजी निकाल देणार आहे.

न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ हा निकाल देणार आहे. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ४० दशलक्ष डॉलर्स आपल्या मुलांना हस्तांतरित केल्याची माहिती दडवून न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल विजय मल्ल्याला दोषी ठरवले होते.

अवमान प्रकरणी गुन्हा दाखल

  • विजय मल्ल्याला अनेक बँकांचे ६,२०० कोटी रुपयांहून अधिक परत करण्याचे आदेश देण्यात आले होते
  • ब्रिटीश स्पिरिट निर्माता डिएजिओकडून $४० दशलक्षचा व्यवहार उघड केला नसल्याबद्दल अवमानाचा दावा केला गेला.
  • यापूर्वी विजय मल्ल्याला शेवटची संधी देताना न्यायालयाने, नाहीतर शिक्षेच्या मुद्द्यावर पुढील निर्णय मल्ल्याच्या अनुपस्थितीत घेतला जाईल, असे सांगितले होते.

विजय मल्ल्यावर आहेत कर्ज घोटाळ्याचे आरोप

  • सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, बँकांनी फरारी विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून एकूण १८,००० कोटी रुपये वसूल केले आहेत.
  • विजय मल्ल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या बँक कर्ज प्रकरणात आरोपी आहे.

किंगफिशर एअरलाइन्सप्रकरणी गुन्हा

  • विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या किंगफिशर एअरलाइन्सवर १.०५ अब्ज पाउंड्सच्या कर्जाबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या समुहाने गुन्हा दाखल केला होता.
  • ब्रिटनमधील एका न्यायालयाने मल्ल्या यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यांबाबत दिवाळखोरी घोषित केली होती.
  • याला उलट करण्यासाठी मल्ल्याने लंडनच्या न्यायालयात दाद मागितली आहे.

Tags: Supreme Courtvijay mallyaअवमान प्रकरणकर्ज घोटाळाविजय मल्ल्यासर्वोच्च न्यायालय
Previous Post

“बा विठ्ठला, सर्व लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी सर्व अडचणी दूर कर!”

Next Post

देशभरातील न्यायालयांमध्ये ५ कोटी खटले प्रलंबित! कधी मिळणार न्याय?

Next Post
supreme court

देशभरातील न्यायालयांमध्ये ५ कोटी खटले प्रलंबित! कधी मिळणार न्याय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!