Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाविद्यालयीन वर्ग त्वरित सुरु करण्याची कुलगुरूंची राज्यपालांकडे मागणी

राज्यपालांनी घेतली विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक

January 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
महाविद्यालयीन वर्ग त्वरित सुरु करण्याची कुलगुरूंची राज्यपालांकडे मागणी

सुषेण नरे / मुक्तपीठ टीम

 

शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी माध्यमिक शाळा सुरू केल्या. पुणे व नाशीक येथील काही शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

याच पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी देखील करीत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी एकमुखी मागणी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचेकडे केली.

 

शाळांमधील मुलांचा किलबिलाट सुरू झाला आहे व आता लवकरच काँलेज मधील गजबजाट ऐकायला येईल. काँलेज तरुणांना आपल्या दुचाकीवरून ऐट मिरवायला मिळेल. काँलेज मधील रोज डे, फँन्सी ड्रेस, सारी डेला विद्यार्थी या वर्षी कोरोना मुळे मुकले आहेत. निदान वेलाइंन्टाईन डे च्या शुभमुहूर्तावर काँलेज गजबजलेल्या अवस्थेत दिसतील असे वाटते. रेल्वे प्रशासनाने नियम व अटीतटींवर आपली सेवा चालू करण्यास समर्थता दाखवल्यावर प्रत्यक्ष महाविद्यालय उघडण्यास सुरुवात होईल व तरूणाई ओसंडेल असे वाटते.

 

राज्यातील विद्यापीठांमधील अनेक पदे रिक्त असल्यामुळे विद्यापीठ प्रशासन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही पदे भरण्याची अनुमती द्यावी अशीही मागणी यावेळी कुलगुरूंनी केली. या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यापीठांना ही पदे यथाशीघ्र भरण्याची अनुमती द्यावी अशी सूचना राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला केली. विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरु करण्याबाबत देखील लवकर निर्णय घ्यावा, असेही राज्यपालांनी सांगितले.

 

राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच राज्यातील सर्व २० विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

 

विद्यापीठांचे २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील प्रत्यक्ष वर्ग सुरु करणे, विद्यापीठांमधील रिक्त संविधाक पदांचा आढावा घेणे तसेच विद्यापीठांच्या वार्षिक  लेखा परीक्षणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता राज्यपालांनी बैठकीचे आयोजन केले.

 

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. विद्यापीठांनी आपली शैक्षणिक वर्षे अगोदरच सुरु केली आहेत व ऑनलाईन पद्धतीने वर्ग देखील होत आहेत. आता करोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अशावेळी महाविद्यालयीन वर्ग सुरु करता येईल का किंवा पाळीमध्ये चालवता येईल का याबाबत विद्यापीठांनी विचार करावा. विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील महाविद्यालये कशी सुरु करावी याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी वर्ग सुरु करण्याबद्दल पुढाकार घेतला पाहिजे. राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपापले लेखापरीक्षण नियमितपणे करून घ्यावे, अशीही सूचनाही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केली.

 

विद्यापीठांमध्ये संविधानिक पदांशिवाय शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त असल्याचे काही कुलगुरूंनी सांगितले.


Tags: collegeEducation Ministermumbaimumbai universityVice-ChancellorVideo Conferenceकुलगुरूराज्यपालविद्यापीठव्हिडीओ कॉन्फरन्सशिक्षणमंत्रीशिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
Previous Post

#मुक्तपीठ शनिवारचं ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

“महाराष्ट्रात बिहार स्टाइल! वाहतूक कोंडीत रिव्हॉल्व्हरबाजी! गाडीवर शिवसेनेचा लोगो”

Next Post
pistul

"महाराष्ट्रात बिहार स्टाइल! वाहतूक कोंडीत रिव्हॉल्व्हरबाजी! गाडीवर शिवसेनेचा लोगो"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!