Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विमानाच्या पेट्रोलपेक्षाही महाग इंधनाने चालतेय आपली गाडी! किंमत जाणून व्हाल थक्क…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
vehicle fuel

मुक्तपीठ टीम

पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही आता बातमीच राहिलेली नाही कारण देशात इंधनाचे दर रोज वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. खिशालाच आग लागत असल्याने भडकलेल्या तुमच्या मनाला अधिकच वेदना होतील अशी एक बातमी आहे. सध्या तुम्ही आम्ही भारतीय चारचाकी किंवा दुचाकी गाड्या चालवण्यासाठी जे पेट्रोल वापरतो ते विमानासाठी लागणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन कॉल किंवा एटीएफपेक्षाही महाग आहे.

 

कार किंवा बाईकमध्ये टाकणाऱ्या पेट्रोलची किंमत आता विमानातील इंधनापेक्षा जास्त आहे. विमानात इंधन म्हणुन वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन कॉल किंवा एटीएफपेक्षा पेट्रोलची किंमत महाग आहे. जर आपण आजच्या किंमतीबद्दल बोललो तर पेट्रोलची किंमत आता विमानाच्या इंधनापेक्षा ३३ टक्के जास्त आहे. मुंबईत एटीएफची किंमत ७० रुपये ८८ पैसे प्रति लिटर असतानाच गाडीच्या पेट्रोलची किंमत १११ रुपये ७७ पैसे आहे.

 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा भडका

  • देशातील पेट्रोलच्या किंमतीनी उच्चांक गाठला आहे.
  • सध्या राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोल ११८ रु. प्रतीलिटरच्या जवळ पोहोचले आहे.
  • तर डिझेलची किंमत सुमारे १०६ रुपये प्रति लीटर आहे.
  • देशातील बहुतांश भागात पेट्रोलची किंमत १०० पार केली आहे.
  • मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, केरळ, कर्नाटक आणि लडाखमध्ये डिझेलचे दरही १०० रु. प्रति लिटर पार झाले आहेत.

 

रोजच भडकत आहेत पेट्रोल-डिझेल

  • गेल्या आठवड्यातील दोन दिवस वगळता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढतच आहेत.
  • गेल्या आठवड्यातच पेट्रोलच्या किंमतीत १.७० रुपयांची वाढ झाली. डिझेलचे दरही त्या आठवड्यात १.७५ रुपयांनी वाढले.
  • भारतात डिझेल-पेट्रोलचे दर गगनाला भिडत आहेत.
  • सरकारचा साधा युक्तिवाद असा आहे की किंमती वाढण्याचे कारण कच्चे तेल आहे, जे आंतरराष्ट्रीय बाजारात महाग होत आहे.
  • गेल्या आठवड्यात सलग सहावा आठवडा होता, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाच्या किंमती वाढल्या.
  • मागच्या १५ दिवसात पेट्रोल ४.६५ रुपयांनी महाग झाले आहे.
  • गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पेट्रोल २० पैशांनी महाग झाले, तर डिझेलही २५ पैसे प्रति लीटर महाग झाले.
  • पेट्रोलच्या किंमती पाहिल्या तर गेल्या १६ दिवसात ते ४.६५ रुपये प्रति लीटर महाग झाले आहे.

Tags: mumbaivehicle fuelएव्हिएशन टर्बाइन कॉलगॅसची दरवाढपेट्रोल-डिझेलमुंबई
Previous Post

मनसेची जोरदार तयारी…पुणे, नाशिकनंतर आता मुंबईच्या भांडुपमध्ये मेळावा!

Next Post

नागपूर अधिवेशनाची तयारी सुरु, सभागृहात सोशल डिस्टन्सिंग असणार!

Next Post
nagpur

नागपूर अधिवेशनाची तयारी सुरु, सभागृहात सोशल डिस्टन्सिंग असणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!