मुक्तपीठ टीम
पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही आता बातमीच राहिलेली नाही कारण देशात इंधनाचे दर रोज वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. खिशालाच आग लागत असल्याने भडकलेल्या तुमच्या मनाला अधिकच वेदना होतील अशी एक बातमी आहे. सध्या तुम्ही आम्ही भारतीय चारचाकी किंवा दुचाकी गाड्या चालवण्यासाठी जे पेट्रोल वापरतो ते विमानासाठी लागणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन कॉल किंवा एटीएफपेक्षाही महाग आहे.
कार किंवा बाईकमध्ये टाकणाऱ्या पेट्रोलची किंमत आता विमानातील इंधनापेक्षा जास्त आहे. विमानात इंधन म्हणुन वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन कॉल किंवा एटीएफपेक्षा पेट्रोलची किंमत महाग आहे. जर आपण आजच्या किंमतीबद्दल बोललो तर पेट्रोलची किंमत आता विमानाच्या इंधनापेक्षा ३३ टक्के जास्त आहे. मुंबईत एटीएफची किंमत ७० रुपये ८८ पैसे प्रति लिटर असतानाच गाडीच्या पेट्रोलची किंमत १११ रुपये ७७ पैसे आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा भडका
- देशातील पेट्रोलच्या किंमतीनी उच्चांक गाठला आहे.
- सध्या राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोल ११८ रु. प्रतीलिटरच्या जवळ पोहोचले आहे.
- तर डिझेलची किंमत सुमारे १०६ रुपये प्रति लीटर आहे.
- देशातील बहुतांश भागात पेट्रोलची किंमत १०० पार केली आहे.
- मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, केरळ, कर्नाटक आणि लडाखमध्ये डिझेलचे दरही १०० रु. प्रति लिटर पार झाले आहेत.
रोजच भडकत आहेत पेट्रोल-डिझेल
- गेल्या आठवड्यातील दोन दिवस वगळता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढतच आहेत.
- गेल्या आठवड्यातच पेट्रोलच्या किंमतीत १.७० रुपयांची वाढ झाली. डिझेलचे दरही त्या आठवड्यात १.७५ रुपयांनी वाढले.
- भारतात डिझेल-पेट्रोलचे दर गगनाला भिडत आहेत.
- सरकारचा साधा युक्तिवाद असा आहे की किंमती वाढण्याचे कारण कच्चे तेल आहे, जे आंतरराष्ट्रीय बाजारात महाग होत आहे.
- गेल्या आठवड्यात सलग सहावा आठवडा होता, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाच्या किंमती वाढल्या.
- मागच्या १५ दिवसात पेट्रोल ४.६५ रुपयांनी महाग झाले आहे.
- गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पेट्रोल २० पैशांनी महाग झाले, तर डिझेलही २५ पैसे प्रति लीटर महाग झाले.
- पेट्रोलच्या किंमती पाहिल्या तर गेल्या १६ दिवसात ते ४.६५ रुपये प्रति लीटर महाग झाले आहे.