Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडो यात्रा: काँग्रेसच्या फलकावर सावरकरही झळकले, नंतर नजरचूक सांगत हात झटकले!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Veer Savarkar Poster

मुक्तपीठ टीम

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज १५ वा दिवस…काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु आहे. दरम्यान भारत जोडो यात्रा ही केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात पोहोचताच पक्षाची एक चूक समोर आली आहे. भारत जोडोच्या पोस्टरमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या रांगेत लावला आहे. नंतर काँग्रेसने त्यांची चूक महात्मा गांधीचा फोटो लावून सुधारण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्ष सावरकरविरोधी भूमिकेसाठी ओळखला जातो. काँग्रेसने कायमच सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक नाहीत अशी भूमिका मांडली आहे. राहुल गांधींनीही अनेकदा या मुद्द्यावरुन टीका केली आहे. असं असताना काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सावरकरांचा फोटो स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंसोबत झळकल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण घटनेवरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भारत जोडो यात्रेच्या पोस्टरमध्ये वीर सावरकरांचा फोटो

  • काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा १४ वा दिवस एका वेगळ्याच विषयाने चर्चेत आला.
  • काँग्रेसकडून या यात्रेसाठी लावण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पोस्टरमध्ये वीर सावरकर यांचा फोटोही लावण्यात आला आहे.
  • जेव्हा हे फोटो व्हायरल होऊ लागले तेव्हा काँग्रेसला आपली चूक लक्षात आली.
  • यासंबंधित एक व्हिडीओही समोर आला आहे.
  • त्यामध्ये एक कार्यकर्ता वीर सावरकरांच्या फोटोवर महात्मा गांधी यांचा फोटो चिटकवताना दिसत आहे.
  • या पोस्टरबाबत काँग्रेसने स्पष्टीकरणही दिले आहे.

काँग्रेसचे स्पष्टीकरण

  • हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काँग्रेसने एक निवेदन जारी करून घाईगडबडीत चुकीने पोस्टर छापण्यात आल्याचे म्हटले आहे.
  • काँग्रेसने याला प्रिंटिंग मिस्टेक म्हटले आहे.
  • या पोस्टरची छापई करणाऱ्यांना सर्व सातंत्र्यसैनिकांचे फोटो वापरण्यास सांगण्यात आलं होतं.
  • त्यामुळे कोणतीही क्रॉस चेकिंग न करता ऑनलाइन सर्च करुन पोस्टर तयार करण्यात आले, असे काँग्रेसने म्हटले.

भाजपाचा काँग्रेला टोला…

  • सावरकरांच्या या पोस्टवरवरुन भाजपानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
  • भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटलं की, वीर सावरकरांचा फोटो एर्नाकुलम (विमानतळाच्या जवळ) काँग्रेसच्या भारत जोडी यात्रेला शोभून दिसत आहे. उशीरा असलं तरी राहुल गांधींना याची जाणीव झाली हे चांगलं आहे. हे तेच राहुल गांधी आहेत ज्यांच्या पणजोबांनी म्हणजेच नेहरुंनी माफीनामा लिहून पंजाबमधील नाभा तुरुंगामधून केवळ दोन आठवड्यांमध्ये स्वत:ची सुटका करुन घेतली होती.
  • शहाजाद पुनावाला यांनी म्हटलं की, राहुलजी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी इतिहास आणि सावरकरांबद्दलचं सत्य समोर आलं. जे हे लपवतात ते भित्रे आहेत.

Veer Savarkar’s pictures adorn Congress’s Bharat Jodo Yatra in Ernakulum (near airport). Although belated, good realisation for Rahul Gandhi, whose great grandfather Nehru, signed a mercy petition, pleaded the British to allow him to flee from Punjab’s Nabha jail in just 2 weeks. pic.twitter.com/i8KxicPl1y

— Amit Malviya (@amitmalviya) September 21, 2022


Tags: Bharat Jodo YatraBJPCongresskeralVinayak Damodar Savarkarकाँग्रेसकेरळभाजपाभारत जोडो यात्राविनायक दामोदर सावरकर
Previous Post

काशी विश्वनाथांनंतर उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, भव्य कॉरिडॉर पाहिलाच पाहिजे असा!

Next Post

शिवाजी पार्क दसरा मेळावा: शिवसेनेला परवानगी नाकारली, आता काय होणार?

Next Post
Maharashtra Political Crisis SC hearing on 22 Aug

शिवाजी पार्क दसरा मेळावा: शिवसेनेला परवानगी नाकारली, आता काय होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!