Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवाजी पार्क दसरा मेळावा: शिवसेनेला परवानगी नाकारली, आता काय होणार?

September 22, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Maharashtra Political Crisis SC hearing on 22 Aug

मुक्तपीठ टीम

शिवसेनेच्या नेत्यांना भीती वाटत होती, तेच घडलं आहे. शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला मुंबई मनपाने परवानगी नाकारली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने परवानगीसाठी केलेले अर्ज मुंबई महापालिकेने फेटाळले आहेत. त्यासाठी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देण्यात आले आहे. अर्थात, असं असलं तरी तेथेच मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचा निर्धार कायम आहे, त्यामुळे उच्च न्यायालयातूनही परवानगी मिळाली नाही तरीही शिवसेना तेथेच मेळावा घेण्यासाठी गनिमी कावा वापरण्याची शक्यता आहे.

दोन्ही अर्ज महापालिकेकडे परवनगीच्या प्रतीक्षेत होते!!

  • शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज केला होता.
  • तर त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनीही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी परवानगीकरता अर्ज दाखल केला होता.
  • हे दोन्ही अर्ज महापालिकेकडे परवनगीच्या प्रतीक्षेत होते.
  • दरम्यान, शिंदे गटाला वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत, उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जी उत्तर विभागाकडे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता.
  • त्यामध्ये जी उत्तर विभागाने या परवानगीबाबत विधी विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आल्याचे लेखी उत्तर शिवसेनेला दिले होते.

मुंबई पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!!

  • या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला पोलीस उपायुक्तांकडून पत्र प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे.
  • अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्यावेळी दोन्ही शिवसेना गटांमध्ये झालेली हाणामारी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दादर पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटांमध्ये घडलेल्या घटनांचा संदर्भ देत आजही दोन्ही गटांमध्ये वाद कायमच असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
  • अशा परिरिस्थितीत शिवाजी पार्कसारख्या संवेदनशील परिसरात दोन्ही गटापैंकी एकाला परवानगी दिल्यास त्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,असे या पत्रात म्हटले असल्याची माहिती मिळत आहे.
  • त्यामुळे पोलिसांच्या पत्रानंतर महापालिकेच्या जी उत्तर विभागाने दोन्ही गटाला शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेत, दोन्ही गटांच्या अर्जदारांना परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवले आहे.

Tags: BMCDasara MelavaShinde GroupShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेदसरा मेळावाबृहन्मुंबई महापालिकाशिंदे गटशिवसेना
Previous Post

भारत जोडो यात्रा: काँग्रेसच्या फलकावर सावरकरही झळकले, नंतर नजरचूक सांगत हात झटकले!

Next Post

द्वेष फसफसणाऱ्या टीव्ही चर्चांचं काय? सरकारी मौनावर न्यायालयाचं बोट

Next Post
Supreme court

द्वेष फसफसणाऱ्या टीव्ही चर्चांचं काय? सरकारी मौनावर न्यायालयाचं बोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!