Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

January 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
Reopen school

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्रातील पाचवी ते आठवीच्या शाळा आज पासून सुरू झाल्या आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत जाऊन उपस्थीत विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत केले. चला मुलांनो चला! शाळेत चला, करु पुस्तकांशी बट्टी, असे गोड आवाहन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

आजपासून राज्यात ५ ते ८ वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांतील म्हाळुंगी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी या  जिल्हा परिषद शाळेस शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट देऊन मुलांच्या व शिक्षकांच्या शाळा सुरु झाल्याबद्द्ल प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ई-लर्निंग आणि डिजीटल शिक्षण कशाप्रकारे विद्यार्थिनी घेत आहेत, याचे प्रात्यक्षिक मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांकडून समजावून घेतले व त्यांचे कौतुकही केले.

 

आज सकाळी पुणे महानगरपालिका हद्दीतील आपटे आणि मॅार्डन शाळा  खाजगी व हुतात्मा शिरीष कुमार या मनपा च्या शाळेतील नववी व दहावी इयत्तेच्या शाळेला भेट दिली. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी कोरोनाच्या काळातील आँनलाईन शिक्षण व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समोर असलेले आव्हान व शिक्षणविषयक चर्चा या भेटीच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सहजपणे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली. शाळेत येताना व जातानाही तसेच सार्वजनिक ठिकाणी असताना मास्कचा वापर करणे. शारीरिक अंतर ठेवणे आणि सातत्त्याने हात स्वच्छ धुणे या आरोग्य विषयक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

 

मुंबई महानगर पालिका, ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिका हद्दीतील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र पाचवी ते आठवीचे वर्ग सुरळीत सुरू झाले.

 

विद्यार्थ्यांच्या या स्वागत भेटीत शिक्षण मंत्र्यांसोबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष कुमार, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक व शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.


Tags: Education Minister Varsha GaikwadSchool reopenई-लर्निंगमहाराष्ट्रशिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
Previous Post

पालघरच्या वाडा तालुक्यात बनावट नोटांचा छापखाना! ३५ लाखांसह चौघे जेरबंद!!

Next Post

देशाच्या विकासात योगदानाच्या संधीबद्दल गोदरेजचे कृतज्ञता कॅम्पेन

Next Post
godrej-consumer-product

देशाच्या विकासात योगदानाच्या संधीबद्दल गोदरेजचे कृतज्ञता कॅम्पेन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!