Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरच्या वाडा तालुक्यात बनावट नोटांचा छापखाना! ३५ लाखांसह चौघे जेरबंद!!

मुंबई गुन्हे अन्वेषण घाटकोपर युनिट ७ची मुंबई आणि पालघरमध्ये धडक कारवाई

January 29, 2021
in कायदा-पोलीस
0
crime branch unit 7 photo wada fake currency -1

मुक्तपीठ टीम

 

बनावट नोटांची छपाई करुन या नोटांची मुंबई शहरात विक्री करणाऱ्या एका टोळीचा घाटकोपर युनिट गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. या युनिटच्या अधिकार्‍यांनी मुंबईतील विक्रोळी आणि पालघरच्या वाडा परिसरात कारवाई करुन चार आरोपींना अटक केली. अब्दुल्ला कल्लू खान, महेंद्र तुकाराम खंडास्कर, अमीन उस्मान शेख, फारुख रसुल चौधरी अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या ३५ लाख ५४ हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहेत. या टोळीचे सदस्य पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील राहत्या घरी बनावट नोटांचा छापखाना चालवत होते.

crime branch unit 7 wada fake currency - photo 3

अटकेनंतर या चौघांनाही बुधवारी दुपारी स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना बुधवार ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटांचे काही विदेशी देशविघातक शक्तींकडून बनावटीकरण करुन, या बनावट नोटा चलनात आणून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न काही टोळ्यांकडून होत आहेत, मुंबई शहरात अशा काही टोळ्या बनावट नोटांची विक्री करीत आहेत अशी माहिती मिळताच वरिष्ठांनी सर्वच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना तपासाचे आदेश देऊन या टोळ्याविरुद्ध विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते, या आदेशानंतर पोलिसांनी अशा आरोपींचा शोध सुरु केला होता.

crime branch unit 7 wada fake currency - photo 5

पोलिसांची शोधमोहीम सुरु असतानाच काहीजण बनावट नोटांची विक्रीसाठी विक्रोळी परिसरात येणार आहेत अशी माहिती घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांना मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीनधनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्तूद, महेंद्र दोरकर, आनंद बागडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिपीन सावंत, नामदेव परबळकर, पोलीस हवालदार अरुण सावंत, राजेंद्र शिंदे, पोलीस नाईक सुभाष मोरे, शशिकांत कांबळे, गिरीश जोशी, मुरलीधर सपकाळे, नागनाथ जाधव, पोलीस शिपाई धर्मराज ताजणे, लुकमान सय्यद, दिपक खरे, महेश सावंत, दिनेश शिंगोटे, चालक पोलीस नाईक संतोष धुमाळ, राजाराम कदम यांनी विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्ग, प्रविण हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

crime branch unit 7 wada fake currency -photo 2

मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता तिथे दोन तरुण आले, या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच अब्दुल्ला खान आणि महेंद्र खंडास्कर या दोघांना पोलिसांनी घेराव लावून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना २ लाख ८० हजार रुपयांचे बनावट नोटा सापडल्या. या दोघांविरुद्ध नंतर विक्रोळी पोलीस ठाण्यात ४८९ (अ), (ब), (क), ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांची पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली असता त्यांनी त्यांचे इतर दोन सहकारी आहेत. त्यांनीच त्यांच्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील राहत्या घरी या बनावट नोटांची छपाई केल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने तिथे जाऊन अमीन शेख आणि फारुख चौधरी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तसेच बनावट नोटांच्या छपाईसाठी लागणारे प्रिंटर, स्कॅनर, पेपर, इंक बॉटल आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

crime branch unit 7 wada fake currency -photo 4

दोन्ही कारवाईत पोलिसांनी चारही आरोपींकडून सहा लाख वीस हजार रुपयांच्या दोनशेच्या ३१० नोटा, एकवीस लाख आठ हजार पाचशे रुपयांच्या पाचशेच्या ४ हजार २१७ नोटा, चार लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांच्या दोनशेच्या २ हजार २७६ नोटा आणि तीन लाख सत्तर हजार शंभर रुपयांच्या शंभरच्या ३७०३ बनावट नोटा जप्त केल्या. या चौघांच्या चौकशीत त्यांचे इतर दोन सहकार्‍यांची नावे समोर आली आहे, मात्र या चौघांच्या अटकेनंतर ते दोघेही पळून गेले आहे. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बुधवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट नोटांची छपाई करुन त्याची बाजारात विक्री करुन भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या चौघांविरुद्ध नंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांनी आतापर्यंत किती बनावट नोटांची छपाई करुन त्याची बाजारात विक्री केली आहे याचा आता पोलीस तपास करीत आहेत.


Tags: fake currencyPalgharwadaपालघरबनावट नोटावाडा
Previous Post

गोरगरीब जनतेची भूक भागविणारी ‘शिवभोजन थाळी’ झाली एक वर्षाची

Next Post

शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

Next Post
Reopen school

शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!