Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वर्धमान महावीरांची अनेकांतवादाची विवेकाधारित विचारसरणी

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
वर्धमान महावीरांची अनेकांतवादाची विवेकाधारित विचारसरणी

डॉ. गिरीश जाखोटिया

नमस्कार मित्रांनो !
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी नववीत असताना ‘तीर्थंकर महावीर’ या शिर्षकाचा एक लेख वाचला होता ज्यात “अनेकांतवाद” या अत्यंत महत्वाच्या तत्वाबद्दलची संक्षिप्त चर्चा होती. या तत्वाचा साधा सरळ अर्थ असा की एकाच वेळी एखाद्या विषयाबद्दल, धारणेबद्दल, संकल्पनेबद्दल आणि घटनेच्या विश्लेषणासंबंधी एकापेक्षा अधिक मते असू शकतात. वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गावर सुद्धा अनेक मतांची व शक्यतांची मांडणी तपासत एखादा निष्कर्ष काढला जातो. ‘अनेकांतवाद’ या शब्दानेही मी तेव्हा हरखून गेलो होतो. आस्तेकदम मी अन्य धर्मांसोबत जैन धर्माबद्दलही भरपूर वाचत गेलो. महाविद्यालयात शिकताना कॉलेजची समृद्ध लायब्ररी मिळाली नि मी अधाशासारखा विविध धार्मिक धारणांबद्दल वाचत गेलो. वडिलांचं वाचन अफाट असल्याने घरीसुद्धा जैन तत्वज्ञानावर पुस्तके वाचायला मिळायची. “आगम” तत्वज्ञानाच्या अवाढव्य चौकटीत बौद्ध आणि जैन मतांचा वरचष्मा ठळकपणे दिसून येतो.

वृषभनाथ ( ऋषभनाथ किंवा आदिनाथ) हे जैन विचारधारेचे ‘प्रथम रचयिता’ आणि ‘प्रथम तीर्थंकर’. तीर्थंकर म्हणजे सामान्यजनांना भौतिक व्यापातून मोक्षाच्या तिर्थाकडे नेणारा मार्गदर्शक. असे चोवीस जैन तीर्थंकर होऊन गेले. शेवटचे म्हणजे चोविसावे तीर्थंकर ‘वर्धमान महावीर’ होते. ज्या काळात हिंसा प्रचंड वाढलेली होती, बटबटीत सांपत्तिक संग्रहाला महत्त्व प्राप्त झालेलं होतं, बौद्धिक व भौतिक चोऱ्या वाढलेल्या होत्या, त्या काळात “अपरिग्रह, अहिंसा, अस्तेय (अचौर्य), ब्रम्हचर्य आणि सत्य” या पाच प्रमुख व्रतांची मांडणी जैन तिर्थंकरांनी केली. महावीर हे साधारणपणे गौतम बुद्धाच्याच कालखंडातले मानले जातात. महावीरांनी ‘अनेकांतवाद’ मांडत विवेकाधारित विचारसरणीची मांडणी केली तर गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना वैज्ञानिक भाषेत सांगितलं की माझे मत तपासून स्विकारा, कालपरत्वे मतांचं वास्तवही बदलू शकतं. वैज्ञानिकही हेच सांगतात की आज मांडलेलं वैज्ञानिक तथ्य हे उद्या बदलू शकतं. ही वैज्ञानिक प्रगल्भता एका बाजूला दर्शविताना महाविरांनी जगण्याची पाच मुलभूत तत्वे तब्बल सव्वीसशे वर्षांपूर्वी मांडली.

जैन तात्विक मांडणीत सामान्यजनांसाठी समाज – नियम हे लौकिक धर्म म्हणून सांगण्यात आले आहेत. आत्मोन्नतीचं तत्वज्ञान हे पारलौकिक धर्म या संज्ञेतून आपल्यासमोर येतं. ‘गणिपिटिका’ हा ग्रंथ महाविरांचा उपदेश सांगतो. ‘कल्पसूत्र’ हा नंतरचा महत्त्वाचा ग्रंथ. अर्धमागधी या प्राकृत भारतीय भाषेला जैन तत्त्वज्ञानाने समृद्ध केलं. पाच जैन अणुव्रतांमधील ‘सत्या’चा आग्रह मला खूप महत्त्वाचा वाटतो. अंधश्रद्धा, स्री – पुरुष असमानता, चातुर्वर्ण्यव्यवस्था व धार्मिक हिंसाचाराच्या ऐतिहासिक कालखंडात ‘सत्या’ची मांडणी ही एक प्रकारे ‘मानवीय महानते’ला आवाहन करणारी वाटते. आज २१व्या शतकात भ्रष्ट भांडवलदारांचा सुळसुळाट जगभर वाढलेला असताना आणि ‘गरीब – श्रीमंत दरी’ ही प्रचंड झालेली असताना महावीरांचा “अपरिग्रहा”बद्दलचा आग्रह खूप संयुक्तिक वाटतो. एखाद्या मोठ्या उद्योगपतीने ‘संपत्तीवाढी’ची किती हाव ठेवावी ? – या प्रश्नाचं उत्तर ‘अपरिग्रहा’वरील चर्चेत आहे. आज जगभरात सर्वत्र भ्रष्ट उद्योगपतींच्या हावरेपणामुळे सामान्य माणूस त्रस्त आहे.

जैन धर्मातील ‘दिगंबर’ पंथाने मोक्षापर्यंत पोहोचविणाऱ्या सातही टप्प्यांची चांगली मांडणी केली. नंतर बऱ्याच उशिरा ‘श्वेतांबर’ पंथाचा उदय झाला. उत्तरेत मुख्यत्वे श्वेतांबर व दक्षिणेत दिगम्बर पंथाचे प्राबल्य आहे. माझ्या निरीक्षणानुसार महावीरांच्या एकूणच शिकवणीची अंमलबजावणी ही ‘दिगंबर’ जैन अधिक चांगली करताहेत. इथे आणखी एक निरीक्षण व ऐतिहासिक तथ्यांश नोंदले पाहिजे – सिंधूजन संस्कृतीचे उत्तम संस्कार दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेत जे सर्वधर्मियांच्या रोजच्या आचरणातून व्यक्त होतात. धर्म कोणताही असो, मातीत रुजलेले संस्कार अधिक प्रभावी ठरतात. दक्षिण भारतातील महाराष्ट्र व कर्नाटकात दिगंबर पंथीय लोकसंख्या बरीच आहे. दिगंबर जैनांना शेतीची व शेतीसंबंधित संस्कृतीची मोठी पार्श्वभूमी आहे.

केवलज्ञान आणि मोक्षदायी अवस्थेपर्यंत नेणाऱ्या सात टप्प्यांची जैन तत्त्वज्ञानातील मांडणी ही सामान्यजनांच्या रोजच्या आचरणावर चांगला प्रभाव टाकते. या मांडणीत ‘कार्यकारणभाव’ हा सुलभ पद्धतीने सांगितला गेलाय. माणसाच्या अस्तित्वाला जे वाईट कर्म आणि वाईट विचार ग्रासतात ते दूर करण्यासाठी महाविरांनी सांगितलेली पाच उत्तम तत्त्वे आचरणात आणायला हवीत. इथे आचरणाच्या बाबतीतली कोणतीही क्लिष्टता जाणवत नाही जी अन्य बऱ्याच धर्मांमध्ये आढळून येते. आनंदाची बाब अशी की या ‘पाच जैन तत्वां’मध्ये नीतिशास्त्राचे सुंदर दर्शन होते. या अर्थाने जैन तत्त्वज्ञान विज्ञानाच्या खूप जवळचे वाटते. हे तत्त्वज्ञान “जगाचा कुणी निर्माता आहे” ही धारणा मान्य करत नाही. जग हे त्याच्या स्वयंभूत रचनेने चालते. ‘केवलज्ञाना’बद्दलची जैन तत्त्वज्ञानातील मांडणी मात्र पुरेशी वैज्ञानिक वाटत नाही. ती इतर धर्मियांसारखी पारंपारिक अध्यात्मिक वाटते. तब्बल तीन हजार वर्षांपूर्वी तीर्थंकर ऋषभनाथांनी जी वैज्ञानिक व मानवी मुल्ये जनतेच्या कल्याणासाठी मांडली व नंतरच्या तीर्थंकरांनी ती अधिक प्रसारित केली, ती ‘मानवते’साठीच्या भारतीय समग्र प्रयत्नांमधील अत्युत्कृष्ट मांडणी होती. धार्मिक आणि राजकीय अनागोंदीच्या काळात तिर्थंकरांनी केलेल्या या प्रयत्नांचे आम्ही सदैव ऋणी असायला हवे.

जैन धर्माचा भारताबाहेर विशेष प्रसार झाला नाही जेवढा तो बौद्ध धर्माचा झाला. भारतातही जैन धर्मीय लोक बऱ्यापैकी अल्पसंख्यांक आहेत. याची काही स्पष्ट कारणे आहेत. रोजच्या जगण्याचे काही कठीण नियम कालपरत्वे सोपे करण्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. जैन गुरुंनी इतर धर्मगुरुंप्रमाणे जैन धर्माचा प्रसार आक्रमकपणे केला नाही. ‘इंद्रियांवर कठोर नियंत्रण’ असणारी व ‘विवेका’ने वागणारी प्रत्येक व्यक्ती ही ‘जैन’च असते. यास्तवही जैन जीवनपद्धतीचा वेगळा प्रचार करण्याची आवश्यकता भासली नसावी. आज ‘जैन’ समाज हा उद्योजकांचा अथवा धनिकांचा समाज समजला जातो ज्याने लोकोपयोगी प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले. बऱ्याच जैन उद्योगपतींनी प्रचंड सामाजिक कार्य केले आहे. परंतु जनमानसात रुजण्यासाठी ‘भावनांका’चा अधिक उपयोग करावा लागतो. जैन गुरुंनी ‘बुध्यांका’वर जास्त भर दिला. कृषक व स्थानिक संस्कृतीला आचरणात स्थान देणाऱ्या ‘दिगंबर’ जैनांनी याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा. यासाठी माझ्या मते “कर्मवीर भाऊराव आणि लक्ष्मीबाई पाटील” हे आदरणीय दाम्पत्य आणि त्यांनी उभ्या केलेल्या ‘रयत शिक्षण संस्थे’चे मोठे चेतनादायी उदाहरण आपल्या समोर आहे !

dr.girish jakhotiya

(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात.)
Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld per IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.


Tags: Dr. Girish JakhotiyaVha Abhivyaktडॉ. गिरीश जाखोटियामहावीर जयंती
Previous Post

“मोदींच्या देशाला मनमोहन सिंग आणि रुझवेल्ट हवे!” सामनाचा ‘रोखठोक’ सल्ला कशासाठी?

Next Post

इमारतींमधील मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण वाढले, झोपडपट्टीवासीयांचे घटले!

Next Post
sero test

इमारतींमधील मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण वाढले, झोपडपट्टीवासीयांचे घटले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!