Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इमारतींमधील मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण वाढले, झोपडपट्टीवासीयांचे घटले!

April 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
sero test

मुक्तपीठ टीम

देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. गेले तीन दिवस मुंबईत मात्र नवीन रुग्ण घटत असल्याने दिलासा मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने नुकतंच तिसरं सेरो सर्वेक्षण केलं. यामध्ये महानगरपालिका हद्दीतील १० हजार १९७ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यातील ३६.३० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. याचा अर्थ तेवढ्या मुंबईकरांमध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. एकीकडे इमारतींमध्ये राहणाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज वाढत असताना झोपडपट्टीत राहणाऱ्या मुंबईकरांमध्ये मात्र ते प्रमाण घटताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईतील जास्त रुग्ण हे इमारतींमधील असल्याचे आढळून येत आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.

१० हजार १९७ नागरिकांच्या तपासणीतून निष्कर्ष

  • नमुना निवड पद्धतीचा वापर करून करण्यात आलेल्या या सेरो सर्वेक्षणात १० हजार १९७ नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे.
  • यापैकी ३६.३० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.
  • झोपडपट्टीच्या तुलनेने इमारतींमधून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आढळण्याचे प्रमाण जास्त आहे.

इमारतींच्या परिसरात अँटीबॉडीज आढळण्याचे प्रमाण

  • २०२०च्या जुलै महिन्यात करण्यात आलेल्या पहिले सेरो सर्वेक्षणात बिगरझोपडपट्टी परिसरात अँटीबॉडीज आढळण्याचे प्रमाण १८ टक्के होते.
  • २०२०च्या ऑगस्टमध्ये यात दोन टक्क्यांनी वाढ झालेली दिसली.
  • २०२१ एप्रिलमध्ये केलेल्या तिसऱ्या सर्वेक्षणात ते प्रमाण २८.५ इतके वाढल्याचे दिसून आले.

झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण

  • झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण पहिल्या सर्वेक्षणात ५७ टक्के होते.
  • दुसऱ्या सर्वेक्षणात ४५ टक्के होते.
  • जे तिसऱ्या सर्वेक्षणात ४ टक्क्यांनी घसरून ४१.६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आली.

कसे झाले सिरो सर्वेक्षण?

  • या सर्वेक्षणात महापालिका दवाखाने आणि खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रक्त नमुन्याची चाचणी करण्यात आली होती.
  • विशेष म्हणजे लसीकरण न झालेल्या लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले होते.
  • सर्वेक्षणानुसार ३५.०२ टक्के पुरुषांमध्ये, तर ३७.१२ टक्के स्त्रियांमध्ये अँटीबॉडीज आढळली.

Tags: coronacorona antibodiesकोरोनाकोरोना अँटीबॉडीजबृहन्मुंबई महानगरपालिकमुंबई
Previous Post

वर्धमान महावीरांची अनेकांतवादाची विवेकाधारित विचारसरणी

Next Post

सीरम करणार महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य, पुनावालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आश्वासन

Next Post
adar poonawala

सीरम करणार महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य, पुनावालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!