Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वैशाली टक्कर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! शेजारच्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून दिला जीव, पोलीस तपासात उघड

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Actress Vaishali Takkar

मुक्तपीठ टीम

टीव्ही शो ‘ससुराल सिमर का’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री वैशाली टक्करने तिच्या इंदूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्याच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वैशालीच्या या कठोर पावलामागे पोलीस तपास करत आहेत. तिच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच वेळी, आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट आले आहे, जे इंदूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त एम रहमान यांनी दिले आहे. रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा एक्स बॉयफ्रेंड अनेक दिवसांपासून अभिनेत्रीला त्रास देत होता, त्यामुळे ती खूप तणावाखाली होती.

अभिनेकत्रीने का उचलले टोकाचे पाऊल?

  • इंदूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त एम रहमान यांनी सांगितले- ‘अभिनेत्रीच्या फोनची आणि इतर चौकशी केली जात आहे.
  • तपासात समोर आले आहे की, वैशालीचा एक्स बॉयफ्रेंड राहुल हा तिच्या शेजारीच राहतो जो तिला अनेक दिवसांपासून त्रास देत होता, त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
  • तिला दुसऱ्याशी लग्न करायचे होते पण तो तिला तसे करण्यापासून रोखत होता. सध्या राहुल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सुसाईड नोटमधून हे रहस्य उघड झाले

  • अभिनेत्री वैशाली टक्करच्या खोलीतून सुसाईड नोट सापडली आहे.
  • ती डिप्रेशनमध्ये होती आणि तिचा शेजारी राहुल नवलानी तिला त्रास देत होता, अशी माहिती मिळाली आहे.
  • राहुल हा बिझनेसमन आहे.
  • सहाय्यक पोलीस आयुक्त एम रहमान यांनी सांगितले की, राहुल हा वैशालीचा शेजारीच होता आणि तो तिचा एक्स बॉयफ्रेंडही होता. तो वैशालीला त्रास देत होता.
  • त्यामुळेच तिने एवढं मोठं पाऊल उचललं. तिचे दुसऱ्या व्यक्तीशी लग्न होणार होते आणि यासाठी राहुल तिला त्रास द्यायचा. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

‘या’ मालिकेतून वैशाली टक्करला ओळख मिळाली होती…

  • वैशाली ठक्करने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
  • त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करून ती स्टार बनली.
  • अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले.
  • ती मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील महिदपूर शहरातील रहिवासी होती. गेल्या तीन वर्षांपासून ती इंदूरमध्ये राहत होती.

Tags: Actress Vaishali TakkarIndoreIndore Assistant Commissioner of Police M Rahmanmuktpeethsuicide caseअभिनेत्री वैशाली टक्करआत्महत्या प्रकरणइंदूरइंदूर सहाय्यक पोलीस आयुक्त एम रहमानघडलं-बिघडलंमुक्तपीठ
Previous Post

पुण्यात वाढतं सेक्स्टॉर्शन, १४००पेक्षाही जास्त गुन्हे!

Next Post

मतदार ओळखपत्र बनवायचे आहे? ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Next Post
Voter ID Card

मतदार ओळखपत्र बनवायचे आहे? ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!