मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशात सध्या सुरु असलेले कोरोना लसीकरण यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकतेच २१६ कोटी लस उत्पादन आणि डिसेंबरपर्यंत १०८ कोटी लोकांना या लसींचे डोस देण्याचा आराखडा सादर केला आहे, असेही जावडेकर म्हणाले.
भारतातील लसीकरणाचे नियोजन
• गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही २०२१च्या अखेरपर्यंत लसीकरणाचे लक्ष्य जाहीर केले होते.
• २०२१च्या अखेर पर्यंत भारतात किमान १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण झालेले असेल.
• कोरोना विषाणूच्या आणखी एका लाटेचा उद्रेक होऊ शकतो. यासाठी देशाच्या आरोग्य सुविधांमध्ये वेगाने सुधारणा केल्या जात आहेत.
• ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ दरम्यान भारत २१६ कोटी लस खरेदी करेल. येत्या जुलैपर्यंत ५१ कोटी डोसची खरेदी केली जाईल.
जूनमध्ये रशियन लस स्पुटनिक-व्ही उपलब्ध होईल
१. कोरोनाविरूद्धच्या युद्धात जूनपासून देशात आणखी एक लस उपलब्ध होणार आहे.
२. जूनच्या दुसर्या आठवड्यापासून रशियन लस स्पुटनिक-व्हीनेही लसीकरण सुरु होईल.
३. अपोलो रूग्णालयाच्या माध्यमातून ही लस देशात प्रथम उपलब्ध होणार आहे.
४. अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने जाहीर केले आहे की, ते रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचे लसीकरण जूनच्या दुसर्या आठवड्यापासून देशभरातील त्यांच्या रूग्णालयात सुरू करणार आहेत.