Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारला नावे कळवली, ट्विटरकडून एकच नाव, आता काय घडणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
social media

मुक्तपीठ टीम

भारतात सोशल मीडिया कंपन्यांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलींनुसार गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह काही सोशल मीडिया कंपन्यांनी आवश्यक त्या अधिकाऱ्यांची नावे केंद्र सरकारला कळवली आहेत. या कंपन्यांनी आपले मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल संपर्क अधिकारी आणि निवासी तक्रार निवारण अधिकारी यांच्या नियुक्तीबद्दल सरकारला माहिती दिली आहे. मात्र, ट्विटरने आतापर्यंत केवळ आपल्या वकीलाचे नाव कळवले आहे. मुख्य अनुपालन अधिकाऱ्यांचे नाव अद्याप कळवलेले नाही. त्यामुळे सध्या केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय पावलं उचलतं, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

सरकारच्या नव्या नियमावलीनुसार काय घडले?

• आतापर्यंत गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, कु, शेअरचॅट, टेलिग्राम आणि लिंक्डइन यांनी सरकारच्या नवीन धोरणानुसार आवश्यक ती संपूर्ण माहिती पाठविली आहे.
• ट्विटरनेही सरकारनं नाराजी व्यक्त केल्यानंतर रात्री उशिरा त्याच्या फर्ममध्ये काम करणाऱ्या वकिलाची माहिती कळवलली आहे.
• ट्विटरसोबत काम करणारे हे वकीलच त्यांचे भारतात नोडल संपर्क अधिकारी आणि तक्रार अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
• परंतु ट्विटरने आपल्या मुख्य अनुपालन अधिकाऱ्याबद्दल अद्याप सरकारला कळवलेले नाही.

 

सरकारने ट्विटरला फटकारले

• ट्विटरद्वारे जारी केलेल्या निवेदनात, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
• सरकारने नव्या सोशल मीडिया नवीन नियमावलीचे पालन न केल्याबद्दल ट्विटरला फटकारले.
• त्यावर सरकारने निवेदन जारी करून ट्विटरला कठोर शब्दात फटकारले
• भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे, असे बजावले.
• तसेच ही नियमावली कोणत्याही खासगी अथवा परदेशी कंपनीच्या फायद्यासाठी नसल्याचेही त्यांना बजावण्यात आले.

 

मार्गदर्शक तत्त्वांबाबत सरकारची कठोर भूमिका

• सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी २५ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.
• या मार्गदर्शक तत्वांना अंमलात आणण्यासाठी ३ महिन्यांचा अवधी दिला. मंगळवारी २५ मे रोजी ही मुदत संपुष्टात आली.
• यानंतरही ट्विटर आणि फेसबुकसारख्या कंपन्या सरकारशी सामना करण्याच्या भूमिकेत होत्या.
• परंतु केंद्र सरकारने थोडीही नरमाई न दाखवता कठोर भूमिका घेतली. त्यामुळे त्यांनीही सरकारला माहिती कळवली.
• आता मात्र इतर कंपन्यांनी नियमांनुसार सर्व नावे कळवली असताना, ट्विटरने फक्त एकच नाव कळवल्याने, सरकार नेमकं काय करते, त्यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


Tags: governmentsocial media appगुगलट्विटरसोशल मीडिया
Previous Post

देशात डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य

Next Post

महाराष्ट्रात टपाल खात्याची २४२८ जागांसाठी भरती, २९ मेपर्यंत वाढवली मुदत

Next Post
Indian post

महाराष्ट्रात टपाल खात्याची २४२८ जागांसाठी भरती, २९ मेपर्यंत वाढवली मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!