मुक्तपीठ टीम
उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या न कोणत्या विषयावरून चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. याशिवाय, ते त्यांच्या चाहत्यांच्या आणि इतर युजर्सच्या प्रश्नांची उत्तरे देखील देतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एका यूजरने त्यांना त्यांच्या जावयाबद्दल प्रश्न विचारताच त्यांनी या प्रश्नावर असे उत्तर दिले की सोशल मीडियावर त्या ट्विटला जोरदार ट्रोल केले जात आहे. ते ट्विट नेमक काय आहे ते जाणून घेवूया…
भारतीय जावई का नाही?
- एका ट्विटर युजरने त्यांना विचारले की भारतीय जावई का नाही.
- यावर ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंदा म्हणाले की, माझ्या मुलांना जीवनसाथी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
- ट्विट करून युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, हे माझे काम नाही.
- माझ्या मुलींना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
- आनंद महिंद्रा यांच्या या उत्तराचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
मुलींच्या निर्णयाचा मला अभिमान – आनंद महिंद्रा
- त्याच वेळी इतर अनेक युजर्सनी वैयक्तिक प्रश्न विचारल्याबद्दल आनंद महिंद्रा यांचा निषेध करत आहेत.
- काहींनी आनंद महिंद्रा यांच्या उत्तराचेही कौतुक केले आहे.
- आनंद महिंद्रा यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, मला मुलींच्या जीवनसाथीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, माझ्या मुली त्यांच्या आवडीनुसार जीवनसाथी निवडू शकतात.
- महिंद्राने स्पष्ट केले की, मुलींच्या निर्णयाचा मला अभिमान आहे.
कवी आशुतोष राणांची कविता आणि आनंद महिंद्रांचे हृदयस्पर्शी कॅप्शन!
- आनंद महिंद्रांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध अभिनेते आणि कवी आशुतोष राणा यांची एक कविता शेअर केली होती.
- त्या कवितेत त्यांनी एक हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिले होते.
- आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन लिहिले होते की, बालपणातील निरागसता आपल्याला त्या अद्भुत वेळेचे मूल्य समजण्यापासून रोखते.