Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आंबा आणि डाळिंब चालले अमेरिकेला…अमेरिका आणि भारतात करार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mango

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने अमेरीकेच्या कृषी विभागाकडून या हंगामात भारतीय आंब्यांची अमेरिकेला निर्यात करण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळविली आहे. आता अमेरिकेतील ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचे भारतातून पाठविलेले आंबे उपलब्ध होणार आहेत. कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे समस्या झाली होती. अमेरिकेच्या कृषी विभागातील निरीक्षकांना आंब्यांवरील विकिरण सुविधेची तपासणी करण्यासाठी भारतात येणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपासून भारतीय आंब्यांच्या अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते. तसेच डाळिंबाच्या बाबतीत घडले होते. आता मात्र दोन्ही देशांमध्ये परस्परांच्या फळांच्या आयात निर्यातीचा करार झाल्याने यावेळी भारतीय आंबा आणि डाळिंब अमेरिकेत जाऊ शकणार आहेत.

 

भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाची १२ वी बैठक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली होती. त्यातील निर्णयांना अनुसरून नुकताच भारताचे कृषी मंत्रालय आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्यादरम्यान परस्परांच्या कृषीबाजारांमध्ये सुगमतेने प्रवेश देण्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या आराखडा करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार, भारतीय आंबे तसेच डाळिंबे यांची अमेरिकेला निर्यात आणि अमेरिकेच्या चेरी आणि अल्फाल्फा हे या पिकांची भारतात आयात करताना दोन्ही देश विकिरण संबंधी संयुक्त नियमावलीचे पालन करतील असे ठरविण्यात आले आहे.

 

परस्परांशी केलेल्या कराराचा भाग म्हणून, भारत हापूस आंब्याच्या येत्या मार्च महिन्यापासून सुरु होणाऱ्या हंगामात अमेरिकेला आंब्यांची निर्यात करू शकणार आहे.भारताने २०१७-१८ मध्ये २.७५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या ८०० टन आंब्यांची अमेरिकेला निर्यात केली होती. त्यामुळे अमेरिकेत भारतीय आंब्यांना मोठी पसंती आणि तेथील ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. तसेच भारताने, २०१८-१९ मध्ये ३.६३ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या ९५१ टन आंब्यांची तर २०१९-२० मध्ये ४.३५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या १,०९५ टन आंब्यांची अमेरिकेला निर्यात केली होती.

 

निर्यातदारांकडून व्यक्त झालेल्या अंदाजांनुसार, २०२२ मधील आंबा निर्यात २०१९-२० पेक्षा अधिक असेल, अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या निर्यात मंजुरीमुळे, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश तसेच तेलंगणा या आंबा उत्पादक पट्ट्यात पिकणाऱ्या आंब्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की या निर्णयामुळे, भारताच्या उत्तर तसेच पूर्व भागातील उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या लंगडा, दशहरी, फझली इत्यादी इतर जातींच्या चवदार आंब्यांच्या निर्यातीला देखील संधी मिळेल. डाळिंबाच्या निर्यातीला एप्रिल २०२२ मध्ये सुरुवात होईल तर अमेरिकेच्या अल्फाल्फा हे आणि चेरी यांची आयात देखील एप्रिल २०२२ मध्येच सुरु होईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: central Governmentgood newsIndian Mango ExportsmangomuktpeethPomegranateUS and India AgreementUSA Department of Agricultureअमेरिका आणि भारत करारअमेरीका कृषी विभागआंबाकेंद्र सरकारचांगली बातमीडाळिंबभारतीय आंब्यांची निर्यातमुक्तपीठ
Previous Post

सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतच बंधनकारक! दारुची दुकाने, बारना महान व्यक्ती, गड-किल्ले नावे देण्यास मनाई!

Next Post

डीआरडीओच्या ‘मेड इन इंडिया’ रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी

Next Post
DRDO anti-tank missile

डीआरडीओच्या ‘मेड इन इंडिया’ रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!