Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीआरडीओच्या ‘मेड इन इंडिया’ रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
DRDO anti-tank missile

मुक्तपीठ टीम

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ११ जानेवारी २०२२ रोजी एमपीएटीजीएम अर्थात ‘माणसाने वाहून नेता येण्याजोग्या आणि विशिष्ट दिशा असलेल्या रणगाडा-विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीपणे अंतिम लक्ष्यभेद चाचणी घेतली. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र वजनाने हलके, फायर आणि फर्गेट पद्धतीचे क्षेपणास्त्र असून माणसांना वाहून नेता येईल अशा प्रक्षेपकाच्या मदतीने हे क्षेपणास्त्र कार्यरत होते आणि त्यात थर्मल साइट म्हणजे तापमानातील बदलानुसार वस्तू ओळख्नायची यंत्रणा अंतर्भूत आहे. आजच्या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक भेद केला आणि लक्ष्य नष्ट केले. लक्ष्यभेदाचा क्षण कॅमेराने टिपण्यात आला आणि विविक्षित किमान पल्ल्यासाठी ही चाचणी यशस्वी ठरल्याचे जाहीर करण्यात आले.

`

किमान अंतराच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची सातत्यपूर्ण कामगिरी सिध्द करण्यासाठी चाचणी करण्यात आली. या मोहिमेची सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण झाली. या क्षेपणास्त्रामध्ये लहान आकाराचा इन्फ्रारेड किरणांचा वापर करून वस्तूचा शोध घेऊ शकणारा शोधक तसेच नियंत्रण आणि मार्गदर्शनपर अत्याधुनिक सुविधा बसविण्यात आल्या आहेत. याआधी कमाल अंतराच्या पल्ल्यासाठी घेण्यात आलेल्या चाचण्या देखील या क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या क्षेपणास्त्राच्या सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरीबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण यंत्रणेचा विकास करून आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तथा डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी यांनीही चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: anti-tank missileDefense Minister Rajnath SinghDefense Research and Development OrganizationDRDODRDO President Dr. G. Satish ReddyInfrared raysmade in indiaइन्फ्रारेड किरणचांगल्या बातम्याडीआरडीओडीआरडीओ अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डीमुक्तपीठमेड इन इंडियारणगाडा विरोधी क्षेपणास्त्रसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थासंरक्षणमंत्री राजनाथ सिंह
Previous Post

आंबा आणि डाळिंब चालले अमेरिकेला…अमेरिका आणि भारतात करार!

Next Post

क्रीडा मंत्रालयाची ऑलिम्पिकसाठी ‘टॉप्स’ योजना, दहा खेळाडूंचा समावेश

Next Post
Olympic

क्रीडा मंत्रालयाची ऑलिम्पिकसाठी ‘टॉप्स’ योजना, दहा खेळाडूंचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!