Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साताऱ्यातील प्रशिक्षणार्थींच्या बसला हिमाचलप्रदेशात अपघात, रावसाहेब दानवेंच्या मदतीनं सुखरुप घरी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Raosaheb Patil Danve saved satara's Mountaineering trainees

अक्षय नलवडे

साताऱ्याचे ५० प्रशिक्षणार्थी मनाली येथे गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. परत येतांना त्यांच्या बसला अपघात झाला. दिल्लीवरुन निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस चुकल्याने केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांची तात्काळ व्यवस्था करुन त्यांना साताऱ्याला पोहचवले. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मदतीचा हात दिला.

मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील ५० प्रशिक्षणार्थी असलेल्या बसचा अपघात झाला होता. प्रशिक्षण संपून माघारी येत असताना मंडी परिसरात हा अपघात झाला. एकूण ५० जण प्रशिक्षणासाठी साताऱ्यातून रेस्क्यू ऑपरेशनच्या ट्रेनिंगसाठी हिमाचल प्रदेश मध्ये गेले होते. प्रशिक्षण संपून परत येतांना मनाली येथील मंडी परिसरात त्यांच्या बसला अपघात झाला होता. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट येथे ट्रेनिं साठी साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्समधून ५० जण या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले होते. चार आठवड्यांचे ट्रेनिंग संपल्यानंतर माघारी येत असताना दुसऱ्या बसने साताऱ्याच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या बसला समोरून धडक दिल्याने चालक गंभीररीत्या जखमी झाला. बसमधील इतर पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ट्रेकर्स टीममधील सर्व सदस्य हे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या तत्परतेमुळे दिल्लीवरुन निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसने सातार्‍याच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या सुखरुप घरी पोहचण्याची सोय झाली. राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या या तत्परतेमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यानंतर हे सर्व साताऱ्याला घरी पोहचेपर्यंत रावसाहेब दानवे त्यांच्या संपर्कात होते व त्यांनी या गिर्यारोहकांना सर्व प्रकारचे सहकार्य केले.

दानवेंना तत्परतेनं मदतीसाठी धन्यवाद!

सातारा जिल्ह्यातील ५० युवक गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी अटल बिहारी माउंटन इन्स्टिट्युट,मनाली याठिकाणी ११ मे रोजी गेले होते. २६ दिवसांचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर दिनांक ५ जूनला मनालीवरून प्रशिक्षणार्थी लक्झरी बसमधून परतीचा प्रवासाला निघालेले असताना मंडीपासून ७० किमी अंतरावर बिसापुर येथील घाटात पहाटे साडेचार वाजता बसला अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. सर्व प्रशिक्षाणार्थी सुखरूप होते. या संकट काळात आम्हाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आम्हाला तत्काळ रेल्वेच्या प्रवासाची तिकीट बूक करून दिली आणि आम्हाला आमच्या घरी सुखरूप पोहचविण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न केले. आमच्या सर्वांची विचारपूस केली.आम्हाला सहकार्य केलं व अडचणीच्या काळी मदत केली या बद्दल आम्ही मा रावसाहेब दानवेसाहेबांच्या आभार व्यक्त करतो.

अक्षय नलवडे ,प्रशिक्षणार्थी लीडर पाटण,सातारा

पाहा व्हिडीओ:


Tags: Mahabaleshwar TrackersmanaliMountaineeringRaosahebh danveSatara TraineesShekhar SinghShivjendra Bhosale Rescue teamShriniwas Patilअटल बिहारी माउंटन इन्स्टिट्युटखासदार श्रीनिवास पाटीलमहाबळेश्वर ट्रेकर्सरावसाहेब दानवेशिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमशेखर सिंह
Previous Post

पवित्र तीर्थ, स्वच्छ तीर्थ: तीर्थस्थानांच्या स्वच्छतेसाठी केंद्राचा राज्यांकडे आग्रह

Next Post

भारत गगनयानातून असीम अंतराळात झेपावणार आणि अथांग समुद्रातही डोकावणार!

Next Post
ISRO Gaganyan Human Space mission

भारत गगनयानातून असीम अंतराळात झेपावणार आणि अथांग समुद्रातही डोकावणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!