मुक्तपीठ टीम
भारतात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत, गेल्या २४ तासात देशात ४ हजार ४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडूसह पाच राज्यांच्या अधिकाऱ्यांना कोरोनाच्या वाढत्या संसर्गबाबत पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये राज्याने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणि संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र:
- केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या पत्रात म्हटले आहे की, ‘अशी अनेक राज्ये दिसत आहेत.
- जिथे काही काळापासून कोरोना संसर्गाची प्रकरणे वेगाने दिसून येत आहेत.
- अशा प्रकारचे कोरोना संसर्ग स्थानिक पातळीवर पसरण्याची शक्यता दर्शवत आहेत.
- अशा परिस्थितीत कोरोना महामारीशी लढत असताना सार्वजनिक आरोग्यासाठी वेगाने काम केले पाहिजे.
- राजेश भूषण यांनी राज्यांना त्यांची रणनीती पाचपट वेगाने पसरवण्याचा सल्ला दिला आहे.
- ते म्हणतात की नवीन कोरोना बाधित प्रकरणांचे निरीक्षण मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले पाहिजे आणि त्याच वेळी राज्यांनी त्यांच्या कोरोना चाचण्यांची संख्या देखील वाढवली पाहिजे.
मुंबईतही सर्वाधिक कोरोना रुग्ण…
- देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे.
- मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे.
- राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
- गेल्या २४ तासात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या ७६७ च्या घरात पोहोचली आहे.
- राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या मुंबईत आहे.
- मुंबईत सध्या ३७३५ सक्रीय रुग्ण आहेत.
- राज्याच्या ६० टक्के सक्रीय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.
- मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के इतका आहे.
- तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५७६ दिवसांवर पोहोचला आहे.