Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्राची गुजरातच्या गिफ्ट सिटीला बजेट गिफ्ट! अस्सल आर्थिक राजधानी मुंबईसाठी काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gujrat

मुक्तपीठ टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नोव्हेंबरमध्ये गुजरातमधील गिफ्ट सिटीला भेट दिल्यानंतर केलेल्या घोषणांची अर्थसंकल्पातील तुरतुदींमुळे पूर्तता वेगानं होवू लागल्याचं मानलं जात आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०२२-२३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. त्यात गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्यात येणार आहे. दरम्यान देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेली पाच वर्ष आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र कार्यरत आहे. आता शेजारच्या गुजरातमध्ये नवे आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र उभे राहिल्यास मुंबईतल्या लवाद केंद्राशी स्पर्धा करावी लागणार आहे. गिफ्ट सिटीला बजेटमधून गिफ्ट देणाऱ्या केंद्राने मुंबईसाठी अर्थसंकल्पात नेमकं काय केलं, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

मुंबईसाठी गेल्या २०१४नंतर खास तरतुदी न करणाऱ्या मोदी सरकारने गेली अनेक वर्षे गिफ्ट सिटीला मात्र कर सवलती, निधी आणि इतर अनेक सवलतींची खैरात केली आहे. तरीही देशातील पहिले आर्थिक केंद्र म्हणून गवगवा केलेल्या गिफ्ट सिटीला म्हणावा तसा उठाव नसल्याने अनेक सरकारी आणि अन्य महत्वाच्या संस्था तिथं स्थापन करण्याची नवी रणनीती अवलंबल्याची चर्चा आहे.

 

गुजरातला गिफ्ट, मुंबईला आव्हान!

  • मुळात देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र उभारण्याची योजना होती.
  • त्यासाठी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीत भूखंडही राखून ठेवण्यात आला आहे.
  • तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या थंडपणामुळे यूपीए कारकीर्दीत काहीच झाले नाही.
  • त्याआधीच गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादजवळ गिफ्ट सिटी उभारली.
  • २०१४मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गिफ्टसाठी अनेक कर सवलती, निधी आणि अनेक पोषक निर्णय घेण्यात आले.
  • मुंबई ते अहमदाबाद दरम्यान अनेक वेगवान वाहतुकीच्या रस्ते, रेल्वे, हवाई सुविधा असतानाही बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा केवळ मुंबई विमानतळ हा गिफ्ट सिटीपासून काही तासांच्या अंतरावर असल्याचे दाखवण्यासाठी असल्याचाही आक्षेप आहे.
  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्रासाठी बीकेसीत राखीव असलेल्या भूखंडाला बुलेट ट्रेनसाठी केंद्राच्या घशात घालण्यात आले.
  • नंतर तिथं आर्थिक केंद्रासाठी जागा मिळणार असली, तरी ती प्रत्यक्षात मुंबईचं केंद्र रखडवण्याचीच तरतुद मानली जाते.

 

नोव्हेंबरमध्येच मिळाले होते धोक्याचे संकेत!

  • २०२१च्या नोव्हेंबरमध्ये गिफ्ट सिटीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भेट दिली.
  • तेव्हा त्यांनी अनेक मोठ्या घोषणा करत भारताचे आर्थिक प्रवेशद्वार बनवण्याची घोषणा केली.
  • मुक्तपीठने तेव्हा याविषयीची बातमी दिली होती.

गुजरातच्या गिफ्टला केंद्राच्या बजेट गिफ्ट्स!

  • गिफ्ट सिटीमध्ये जागतिक दर्जाच्या परदेशी विद्यापीठांना मुक्तद्वार देण्यात आले आहे.
  • आर्थिक व्यवस्थापन (फायनान्शियल मॅनेजमेंट), फिंटेक सायन्स, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित विषयक विविध अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
  • गुजरात सरकार किंवा स्थानिक कायदे किंवा नियम या विद्यापीठांना लागू होणार नसून गिफ्ट सिटी प्राधिकरणाकडून नियंत्रण ठेवले जाईल आणि या विद्यापीठांसाठी सोयीसुविधा पुरविल्या जातील.
  • वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञ उपलब्ध व्हावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

हे ही नक्की वाचा:

निर्मला सीतारामन यांची गुजरातच्या गिफ्ट सिटीला ५०० कोटींची गिफ्ट!


Tags: gift citygujratGujrat Gift CitymumbaiNIRMALA SITARAMANअर्थमंत्री निर्मला सीतारामणआंतरराष्ट्रीय लवाद केंद्रगिफ्ट सिटीगुजरातमुंबई आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र
Previous Post

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १३३ जागांसाठी भरती

Next Post

शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजनाचे निर्देश!

Next Post
Agriculture Minister Dadaji Bhuse

शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजनाचे निर्देश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!