Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऊर्जा खात्यातील रिक्त पदे भरण्याबाबत बेरोजगार अभियंत्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन

January 5, 2022
in घडलं-बिघडलं, प्रेस रिलिज
0
रोजगार

मुक्तपीठ टीम

  • महावितरण, महापारेषण, महानिर्मिती मध्ये एकूण ३८,७०० पदे रिक्त
  • सहाय्यक व कनिष्ठ अभियंता रिक्त पदे तातडीने सरळसेवा भरतीद्वारे भरावेत
  • सहाय्यक अभियंता पदी गेट परीक्षाची सक्ती रद्द करावी
  • २०१७-१८ नंतर भरती झाली नाही
  • मागील दारातून होणारी कंत्राटी भरती थांबवावी

 

राज्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती मध्ये जवळपास ३८,७०० हून अधिक पदे रिक्त आहेत. यामध्ये सहाय्यक व कनिष्ठ अभियंता (विद्युत / स्थापत्य) सह इतर पदे रिक्त आहेत, या सर्व रिक्त जागा आयबीपीएस द्वारे सरळसेवा परीक्षा घेऊन तातडीने भरावे; सहाय्यक अभियंता या पदांच्या भरती करिता गेट परीक्षेची लादलेली सक्ती रद्द करावी; सन २०१७-१८ पासून भरती न निघाल्यामुळे अनेकांच्या वयोमार्यदा ओलांडून गेले आहे. तरी याचा विचार होऊन वयोमर्यादा देखील वाढविण्यात यावे; महावितरण, महापारेषण मधील कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रद्द करावी, ऊर्जा खात्यातील भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा आदी मागण्या बाबत बेरोजगार अभियंत्यांनी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून आझाद मैदान येथे एक दिवसीय आंदोलन छेडण्यात आले. सदर मागण्याचे निवेदन ऊर्जा मंत्री, उपमुख्यमंत्री यांना शिष्टमंडळ द्वारे देण्यात आले. येत्या १० दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

 

या आंदोलनात रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम, अक्षय गुजर; स्टेपअप अकॅडमी प्रमुख राहुल काळे सर यांच्यासह केदार खैरे, योगेश शेळके (पुणे), अनिकेत मस्के (नाशिक), पवन दंडले, मयूर गये (अकोला), शुभम खांद्रे, राहुल पंधारे (नांदेड), निकिता धुम्मा, अमर बदर (सोलापूर), अमोल धंदे, ऋषिकेश चव्हाण, अश्विनी राजपूत, सागर क्षीरसागर (औरंगाबाद), प्रिया अत्राम (चंद्रपूर), अनंत कंकाळे, मोनिका बनसोडे (अमरावती), स्वप्नील पाटील (उस्मानाबाद), सुमित कुरुंद, राहुल घायल (लातूर), नेहा भांबरे (बुलढाणा), आदी विविध जिल्ह्यातून बेरोजगार अभियंत्यांनी आपला पाठिंबा नोंदवला.

 

गेल्या तीन वर्षात मृत्यू व सेवानिवृत्तीमुळे या तिन्ही कंपन्यामधील रिक्त पदांची संख्या आणखी वाढली आहे. मागील वर्षी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ८५०० रिक्त जागा तातडीने भरण्याचे आश्वासन दिले होते तसेच दि.६ जुलै रोजी विधान परिषद मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जा खात्यातील जवळपास ६००० रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यावर काहीही कार्यवाही झाली नाही. यामुळे राज्यातील लाखो बेरोजगार अभियंता यांच्या मध्ये राज्य सरकारच्या कारभाराबाबत आक्रोश निर्माण झालेला आहे. मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना ऊर्जा खाते याकडे कानाडोळा करत आहे. बेरोजगार अभियंता यांनी जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

मुंबई
दि.०५.०१.२०२२

अमोल बबन वेटम,
संघटना प्रमुख, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन
Mobile ९७६५३२६७३२


Tags: @Rajatsethi86Azad Maidan agitationEnergy Departmentjob opportunityMahapareshanMahavitaranUnemployed Engineerआझाद मैदान आंदोलनऊर्जा खातेबेरोजगारबेरोजगार अभियंतामहानिर्मितीमहापारेषणमहावितरणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

अनाथांची माई सिंधुताईंच्या जाण्यानं सारेच व्याकूळ…पोरकं करून गेल्याची भावना!

Next Post

केंद्राचा कोरोनाविरोधी निधी खर्च करण्यात राज्यांची कंजुशी, ६८४ कोटींपैकी महाराष्ट्राने खर्च केले फक्त २ कोटी!

Next Post
modi nd thackeray

केंद्राचा कोरोनाविरोधी निधी खर्च करण्यात राज्यांची कंजुशी, ६८४ कोटींपैकी महाराष्ट्राने खर्च केले फक्त २ कोटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!