Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंचे शिंदे आणि भाजपाला ३ प्रश्न! हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाहीच!! आरेत मेट्रोतून मुंबईचा घात नको!!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray 3 questions to Eknath Shinde And BJP

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांपुढे भूमिका मांडली. नव्या सरकारचे अभिनंदन करतानाच सर्वसामान्यांचं भलं व्हावं अशी अपेक्षा त्यांनी उपस्थित केले. त्यानंतर त्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेना काही प्रश्न विचारले. त्यात मुख्यमंत्रीपदाचं राजकारण, आरे जंगलात पुन्हा मेट्रो कार शेड आणि या तीन मुद्द्यांचा समावेश होता. त्यात त्यांनी एकनाथ शिंदेंचा तथाकथित शिवसैनिक असा उल्लेख करत हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाहीच, असं स्पष्ट शब्दात बजावलं.

माझ्यासमोर तीन प्रश्न आहेत.

मुद्दा -१
अडीच वर्षांपूर्वी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद का नाही दिले? आताचा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाहीच!

हे सरकार त्यांनी स्थापन केलं. एका तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री बनवले. माझं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं हेच ठरलेले होते. अडीच अडीच वर्षांचे. आता जी काही कुरघोडी झाली ती झाली नसती. आताची जी जोडगोळी तेव्हा झाली असती. मला प्रश्न हा पडला की शिवसेना अधिकृत तुमच्यासोबत होती तेव्हा हे का नाही घडले? हे जे आता भाजपासोबत गेलेत, त्यांनी स्वत:च्या मनाला प्रश्न विचारायला पाहिजे. ज्यांनी अडीच वर्षापूर्वी शब्द मोडला. त्यावेळी नकार देऊन आता का हे घडलं? लोकसभा विधानसभा एकत्र होतो. मला का मुख्यमंत्री बनायला लावलं? महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. तथाकथित शिवसैनितकाला हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही.

मुद्दा – २
मुंबईवर राग काढू नका, आरे जंगलाचा घात करू नका!

  • माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका.
  • मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका.
  • कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही.
  • मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेतच मेट्रो कार शेडचा आग्रह रेटू नका.
  • जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल.
  • आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत.
  • पण मधल्या काळात तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो समोर आला होता.
  • म्हणजे तिथे वन्यजीव आहेत.
  • मला धोका हा वाटतो की आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातलं वन्यजीवन धोक्यात येईल.
  • असं करता करता मग आता तिकडे काहीच नाही म्हणत अजून पुढे जाल

मुद्दा – ३
मतदारांना लोकप्रतिनिधींना बोलवण्याचा अधिकार पाहिजे!

  • लोकशाहीच्या चारही स्तंभांनी आता पुढे यावं!
  • लोक ज्यांना निवडून देतात ते नंतर वाट्टेल ते करतात. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी म्हटलेलं तसं मतदारांना
  • लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार पाहिजे.
  • लोकशाहीत चारही स्तंभाचे महत्व आहे. माझं चारही स्तंभांना आवाहन आहे, तुम्ही पुढे या, लोकशाही वाचवण्यासाठी आलं पाहिजे.

Tags: Aarey Car ShedBJPEknath Shindemumbaimumbai metroआरेत मेट्रोउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेभाजपामुंबई
Previous Post

मुंबई मराठी पत्रकार संघ: अध्यक्षपदी पुन्हा नरेंद्र वाबळे, विश्वस्तपदी देवदास मटाले, राही भिडे आणि कार्यवाहपदी संदीप चव्हाण

Next Post

#मुक्तपीठ #LiVE उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका : “‘हा’ मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही!”

Next Post
#मुक्तपीठ #LiVE  उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका : “‘हा’ मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही!”

#मुक्तपीठ #LiVE उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका : "'हा' मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!