मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांपुढे भूमिका मांडली. नव्या सरकारचे अभिनंदन करतानाच सर्वसामान्यांचं भलं व्हावं अशी अपेक्षा त्यांनी उपस्थित केले. त्यानंतर त्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदेना काही प्रश्न विचारले. त्यात मुख्यमंत्रीपदाचं राजकारण, आरे जंगलात पुन्हा मेट्रो कार शेड आणि या तीन मुद्द्यांचा समावेश होता. त्यात त्यांनी एकनाथ शिंदेंचा तथाकथित शिवसैनिक असा उल्लेख करत हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाहीच, असं स्पष्ट शब्दात बजावलं.
माझ्यासमोर तीन प्रश्न आहेत.
मुद्दा -१
अडीच वर्षांपूर्वी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद का नाही दिले? आताचा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाहीच!
हे सरकार त्यांनी स्थापन केलं. एका तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री बनवले. माझं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं हेच ठरलेले होते. अडीच अडीच वर्षांचे. आता जी काही कुरघोडी झाली ती झाली नसती. आताची जी जोडगोळी तेव्हा झाली असती. मला प्रश्न हा पडला की शिवसेना अधिकृत तुमच्यासोबत होती तेव्हा हे का नाही घडले? हे जे आता भाजपासोबत गेलेत, त्यांनी स्वत:च्या मनाला प्रश्न विचारायला पाहिजे. ज्यांनी अडीच वर्षापूर्वी शब्द मोडला. त्यावेळी नकार देऊन आता का हे घडलं? लोकसभा विधानसभा एकत्र होतो. मला का मुख्यमंत्री बनायला लावलं? महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. तथाकथित शिवसैनितकाला हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही.
मुद्दा – २
मुंबईवर राग काढू नका, आरे जंगलाचा घात करू नका!
- माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका.
- मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका.
- कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही.
- मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेतच मेट्रो कार शेडचा आग्रह रेटू नका.
- जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल.
- आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत.
- पण मधल्या काळात तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो समोर आला होता.
- म्हणजे तिथे वन्यजीव आहेत.
- मला धोका हा वाटतो की आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातलं वन्यजीवन धोक्यात येईल.
- असं करता करता मग आता तिकडे काहीच नाही म्हणत अजून पुढे जाल
मुद्दा – ३
मतदारांना लोकप्रतिनिधींना बोलवण्याचा अधिकार पाहिजे!
- लोकशाहीच्या चारही स्तंभांनी आता पुढे यावं!
- लोक ज्यांना निवडून देतात ते नंतर वाट्टेल ते करतात. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी म्हटलेलं तसं मतदारांना
- लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार पाहिजे.
- लोकशाहीत चारही स्तंभाचे महत्व आहे. माझं चारही स्तंभांना आवाहन आहे, तुम्ही पुढे या, लोकशाही वाचवण्यासाठी आलं पाहिजे.