मुक्तपीठ टीम
राज्यातील आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपा यांच्यातील आरोप प्रत्यारोप हे नेहमीचेच. बारामतीत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्र्स्टच्यामाध्यमातून कृषी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या अटल इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपाला चांगलचं सुनावलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी भाजपसोबतच्या २५ वर्षाच्या युतीवर भाष्य केलं. राजकारणात उबवणी केंद्र असायला पाहिजेत. आम्हीही २५ वर्ष उबवणी केंद्रे निर्माण केली होती. आम्ही नको ती अंडी उबवली. आता त्याचं काय झालं ते तुम्ही पाहातच आहातच, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मारला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती येथील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इन्कयुबेशन सेंटरचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्पवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होते.
शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत
- शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. सुप्रिया तू खरं सांगितलं की खोटं…सहस्त्रचंद्रदर्शन… ज्याने विकासाचा सूर्य दाखवला…अजूनही थांबत नाही.
- पवारसाहेब नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचं आणि या संस्थांचं.
- सर्व कुटुंबच तळमळीने काम करत आहे.
- कुटुंब रंगलं काव्यात तसं पवार कुटुंब एका ध्यासात रमलं आहे, अशी स्तुतीही त्यांनी केली.
…तर किमान विघ्न आणू नये
- राजकारणात टीकाकार असतात असलेच पाहिजे. आम्हीही इतके दिवस तुमचे टीकाकार आहोत.
- शिवसेना प्रमुख म्हणायचे, अरे शरदबाबू बारामतीत काय करतात ते जरा बघितलं पाहिजे.
- हे असे संबंध होते.
- राजकारणात पटत नाही म्हणून एखाद्याच्या कामात विघ्न आणणं योग्य नाही.
- पाठिंबा देता येत नाही तर किमान विघ्न आणू नये.
- पण काय करावं आपल्याकडे अनेक विघ्नसंतोषी लोकं आहेत.
बारामतीतून सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात!
- गाडीतून येताना अजितदादा सांगत होते पुण्यानंतर बारामती नंबर दोनचं केंद्र बनेल, मुख्यमंत्र्यांनी असं म्हणताच एकच हशा पिकला.
- बारामती राजकारणाचं केंद्र आहेच.
- पण शिक्षणाचंही केंद्र होणार आहे.
- इथे सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात.