Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरोपांचा गदारोळ! ईडी, सीबीआय, आयटी यांच्या कारवाईंचं चक्र! नांदेडमध्ये आघाडीनं भाजपाला हरवलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
degluru

मुक्तपीठ टीम

नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी होत आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे लढलेले काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी १ लाख ७ हजार ४० मते मिळवत ४१ हजार ९३३ मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे यांचा पराभव केला आहे. अंतापूरकरांना  हजार  मते मिळाली आहते. तर भाजपाच्या साबणेंना मते मिळाली आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ माजला आहे. ईडी, सीबीआय, आयटी यांच्या कारवाईंचं चक्र सुरु आहे. नांदेडमधील प्रभावशाली नेते अशोक चव्हाण यांच्याविरोधातही चौकशी होत असल्याच्या निवडणूक काळातच बातम्या आल्या. पण तरीही नांदेडमध्ये आघाडीनं भाजपाला हरवलं!

 

देगलूर बिलोली निकाल

  1. काँग्रेस जितेश अंतापूरकर विजयी – १,०८८४०
  2. भाजपा – सुभाष साबणे – ६६,९०७
  3. वंचित बहुजन आघाडी डॉ. उत्तम इंगोले

देगलूर बिलोली मतदार संघ हा नांदेड जिल्ह्यात आहे. काँग्रेसचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील या मतदारसंघात २०१९मध्ये काँग्रेसचे अंतापूरकर विजयी झाले होते. मात्र, त्यांचे निधन झाले. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली. पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची जागा हिरावून घेतल्यामुळे उत्साहात असलेल्या भाजपाने देगलूर बिलोलीत विजय मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र, इथं पंढरपूरसारखा विजय मिळवणे शक्य झाले नाही.

 

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात होते. प्रमुख लढत ही तीन उमेदवारांमध्ये झाली. संपूर्ण महिनाभर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये होते. भाजपानेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजपचे अनेक मोठे नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जोर लावला होता.

 

अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर, भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांच्यातील लढतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले हेही मैदानात असल्याने रंगत वाढली होती.

 

 


Tags: BJPCongressJitesh Antapurkarकाँग्रेसजितेश अंतापूरकरभाजपामहाराष्ट्र विकास आघाडी
Previous Post

आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली, मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपाला सुनावलं

Next Post

राज्यात १०७८ नवे रुग्ण, १,०९५ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
corona

राज्यात १०७८ नवे रुग्ण, १,०९५ रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!