Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राहुलजी गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी कराः नाना पटोले

मुंबईत एच. के. पाटील तर गडचिरोलीतून नाना पटोलेंच्या शुभहस्ते सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

November 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
rahul gandhi

मुक्तपीठ टीम 

काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत शहरात झाली. मुंबई व महाराष्ट्राने काँग्रेस पक्ष, इंदिराजी, राजीवजी यांना ताकद दिली आहे. आजपासून सुरु झालेल्या काँग्रेस सदस्य नोंदणीतही जास्तीत जास्त सदस्य नोंदवून मुंबई आणि महाराष्ट्राने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाच्या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घ्यावे असे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी म्हटले आहे.

rahul gandhi

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते आज काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम, संदीप, सोनल पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे,  नसीम खान,  खजिनदार डॉ. अमरजीत सिंह मनहास, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे , मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. हुसेन दलवाई, मोहन जोशी, कमांडर कलावत, देविदास भन्साळी, भा. ई. नगराळे,  प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रमोद मोरे, राजेश शर्मा, राजन भोसले, रामचंद्र आबा दळवी, मनोज शिंदे, जोजो थॅामस, ब्रिजकिशोर दत्त, भावना जैन, व्हीजेएनटी विभागाचे अध्यक्ष मनोज जाधव, माजी आ. सुभाष चव्हाण, हुस्नबानो खलिफे, प्रवक्ते अरुण सावंत, सचिव झिशान अहमद, आनंद सिंग, विश्वजीत हाप्पे, आदी उपस्थित होते.

 

मुंबईसोबत राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी आज सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गडचिरोली येथे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात,  कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांच्या हस्ते तर अमरावती येथे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते सदस्य नोंदणीचा शुभारंभ झाला.

rahul gandhi

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, मुंबईच्या ऐतिहासिक आणि पवित्र महानगरात काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबई काँग्रेस विचारांचं शहर आहे. काँग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर १ नोव्हेंबरपासून काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे. मुंबई काँग्रेस १० लाख सदस्यांची नोंदणी करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी. आपले नेते राहुलजी गांधी २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करणार आहेत त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीचा आढावा त्यांच्यासमोर मांडा.

 

यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, देशाचे संविधान आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्या पासून संविधान आणि पर्यायाने देशाला कमजोर करण्याचे काम सुरु आहे. देश वाचवायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही त्यामुळे जास्तीत लोकांना काँग्रेससोबत जोडले पाहिजे.

rahul gandhi

यावेळी बोलतना चंद्रकांत हंडोरे म्हणाले की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचारांचे सरकार आले तरच देशात लोकशाही आणि संविधान अबाधित राहील त्यामुळे जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा.

 

गडचिरोली येथील कार्यक्रमात बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस विचारांना मानणारा मोठा वर्ग राज्यात असून काँग्रेसला नेहमी त्यांनी साथ दिली आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी करणे गरजेचे असून गावा गावात जाऊन काँग्रेचे सदस्य नोंदणी करा व पक्षाची ताकद वाढवा. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना फक्त राहुल गांधी हेच पर्याय आहेत. भाजपचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते. त्यामुळे राहुलजी गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्यनोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


Previous Post

प्रकल्पबाधित मच्छिमारांना नुकसानभरपाई धोरणासाठी अभिप्रायांसाठी आवाहन

Next Post

आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली, मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपाला सुनावलं

Next Post
cm uddhav

आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली, मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपाला सुनावलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!