Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘पुरस्कार’ अभिमान आणि शान वाढविणारा असतो! – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

April 26, 2022
in सरकारी बातम्या
0
मा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान 2

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केले जाते. या कार्याची दखल घेवून शासनाच्यावतीने एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना पाठबळ आणि ऊर्जा मिळावी, यासाठी दरवर्षी पुरस्कार जाहीर केले जातात. पुरस्कार हा अभिमान आणि शान वाढविणारा असतो, असे प्रतिपादन  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

मा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान 1            

मुंबईत नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ येथे उच्च व तंत्रशिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत २०१६-१७ ते सन २०२०-२१ या काळातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी एस. एन. डी. टी महिला विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरु डॉ.उज्वला चक्रदेव, महाराष्ट्र पशु व मत्स्यविद्यापीठ, नागपूर डॉ.ए.एम.पातुरकर, राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीचे सदस्य अंकीत प्रभू, अमित गुप्ता, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान 3 (1)           

उदय सामंत म्हणाले, देशाला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे कार्य राज्यातील एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून कार्य केले आहे. या विद्यार्थ्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे यासाठी मागील पाच वर्षातील सर्व पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा आदर्श घेवून सामाजिक कार्य केले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेमधून विद्यार्थ्यांना मिळणारे मानधन कमी असल्याने यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आणि यामध्ये जवळपास ६५ टक्के वाढ करण्यात आली. तसेच राज्यांच्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेसाठी सात कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला, अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.

            

देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य देशातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे याचा राज्याला अभिमान आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे येथे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे सांगून कोरोनाच्या संकटानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन असा संभ्रम निर्माण झाला आहे. या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी एन.एस.एस. विद्यार्थ्यांनी एक चळवळ म्हणून काम करावे, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले. दरम्यान ‘कोविड योद्धा’ म्हणून कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचे ‘कोरोना युवा योद्धा’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

            

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मागील पाच वर्षातील राज्यातील पुरस्काराचे वितरण करण्यात आले.


Tags: MaharashtramumbaiNSSSNDT Womens Universityएन.एस.एसराष्ट्रीय सेवा योजना
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक क्लिक….आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीचे ४८३ कोटी रुपये थेट खात्यात जमा!

Next Post

लोकसभेच्या अध्यक्षांनी मागितली खासदार राणांच्या अटकेची माहिती

Next Post
Rana

लोकसभेच्या अध्यक्षांनी मागितली खासदार राणांच्या अटकेची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!