मुक्तपीठ टीम
गुगल प्रत्येक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. गुगलच्या कलाकृतीमागे त्यांच्या काही कल्पना असतात. काही वेळा काही पॉपअप, रेखाचित्रे स्केच, माहिती, खेळ, अॅनिमेशन आणि बरेच काही असते. २५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगाने नाताळ सण साजरा केला. या निमित्ताने गुगलवर एक मोठा मनोरंजक गेम लाइव्ह झाला. गेम खेळण्यासाठी ,युजर्सना गुगल सर्चमध्ये ‘ख्रिसमस’ किंवा ‘सांता ट्रॅकर’ टाइप करून सर्च करा. यानंतर स्क्रीनवर एक गिफ्ट बॉक्स दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर समोर एक पेज ओपन होईल. या पेजच्या वरच्या बाजूला ‘सांता ट्रॅकर’ लिहिलेले आहे आणि संपूर्ण पेज ख्रिसमसच्या सेलिब्रेशनने सजवलेले आहे. येथे युजरला पेजवरील प्ले बटण दिसेल, ज्यावर क्लिक करून थेट गेम खेळता येईल.
वेग-वेगळे अनोखे गेम्स खेळा आणि सांतासोबत सेल्फीही काढा!
- गुगलच्या या ख्रिसमस स्पेशल सेटअपची खास गोष्ट म्हणजे संपूर्ण पेज साउंड इफेक्टसह उपस्थित आहे.
- ते बंद करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
- पेजच्या वरच्या डाव्या बाजूला हॅम्बर्गर मेनू (तीन ओळी) आहेत.
- यावर टॅप केल्यास युजरला वेगवेगळ्या गेममध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.
- त्यात कोड बूगीसारखे अनेक खेळ खेळता येतील.
- एवढेच नाही तर सांताच्या सेल्फीवर मेकअपही करता येतो.
ख्रिसमस कसा साजरा केला जातो?
- २५ डिसेंबरच्या दिवशी ख्रिसमसच्या निमित्ताने सांताचे ड्रेस, ख्रिसमस ट्री, लाईट्स, भेटवस्तू, केक, चॉकलेटसह अनेक प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध असतात.
- जगभरात साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी लोक आधीच तयारी सुरू करतात.
- विशेषत: ख्रिश्चन समुदाय प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेला असतो.
- जगभरातील लोक ख्रिसमसचा दिवस कुटुंबासह एकत्र असतात, कॅरोल गातात आणि स्वादिष्ट अन्न खातात.