मुक्तपीठ टीम
एलॉन मस्क ट्विटर कंपनीचे मालक होताच त्यांनी अनेक बदल केलेत. त्यांनी अनेक नवीन फिचर्स पैसे भरुन वापरण्याची संधी युजर्सना दिली. एलॉन मस्क यांनी काहीदिवसांपूर्वी ट्विटवरची ब्लूटिक सबस्क्रिप्शन सेवा बंद केली होती. ट्विटवर काही बनावट खात्यांच्या तक्रारी आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते. आता एलॉन मस्क यांनी ट्विट करत ट्विटरची $8 ब्लूटिक सबस्क्रिप्शन सेवा २९ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बनावट खात्यांच्या तक्रारीनंतर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने ते तात्पुरते निलंबित केले होते.
ब्लूटिक सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा सुरु होणार…
- ट्विटरवर अनेक सेलिब्रिटी, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि इतर लोकांना ब्लूटिक्स देण्यात आले होते.
- यासाठी आधी त्यांची प्रोफाइल पडताळणी करण्यात आली होती.
- ट्विटरने ६ नोव्हेंबरला ब्लूटिक मिळवण्याची घोषणा केली होती.
- ही सेवी मिळवण्यासाठी $8 रुपये भरावे लागणार.
- उत्पन्न वाढवण्यासाठी कंपनीने हे केल्याचे समोर आले होते.
- परंतू या निर्णयामुळे बनावट अकाऊंटमध्ये वाढ झाली.
- त्यामुळे ट्विटरला तात्पुरती ही सेवा बंद करावी लागली.
- मस्क यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे की, ‘ब्लू व्हेरिफाईड २९ नोव्हेंबरपर्यंत रीस्टार्ट केले जाणार आहे.
- मस्क म्हणाले की, नवीन लाँचसह, कोणतेही सत्यापित नाव बदलल्यास ब्लूटिक चिन्ह काढून टाकले जाईल.
- ट्विटरच्या सेवा अटींनुसार नाव सत्यापित केल्यानंतरच ब्लूटिक परत मिळेल.