मुक्तपीठ टीम
एलॉन मस्क यांनी नुकतीच ट्विटरची खरेदी केली. ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक मोठे बदल केले. अनेकांची नोकरीवरून हकालपट्टी असो किंवा ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन असो, प्लॅटफॉर्मवर असे अनेक मोठे बदल झाले. या बदलांनंतरही एलॉन मस्क यांनी अजून माघार घेतली नाही आहे. ते म्हणाले की ट्विटरला लवकरच मोठे लेख प्रकाशित करण्याचा पर्याय मिळेल. यासह, यूजर्सना नोटपॅडवर त्यांचे लेख लिहून स्क्रीन शॉट पोस्ट करण्याची आवश्यकता नाही. तसेच, ट्विटरवर कंटेंट पोस्ट करणाऱ्या निर्मात्यांना पैसे कमविण्याची संधी मिळेल.
एका यूजरने म्हटले की, यूट्यूब जाहिरात कमाईच्या ५५ टक्के कंटेंट निर्मात्यांना देते. मस्क यांनी यावर म्हटलं की, ट्विटर अधिक पैसे देईल. यामध्ये सर्व प्रकारच्या निर्मात्यांचा समावेश असेल. ट्विटरवर सर्चमध्येही सुधारणा करण्यात येईल. यामध्ये अनेक उणिवा आहेत, त्या दूर करण्यात येत असल्याचे मस्क यांनी सांगितले.
व्हिडीओ पोस्टिंगबाबतही नवीन नियम
- एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील व्हिडीओ पोस्टबाबतही बदल केले आहेत.
- या बदलांबद्दल बोलताना ते म्हणाले की, ट्विटरने संमती दिल्याशिवाय कोणताही व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर पोस्ट करता येणार नाही.
- यात प्री-रोल व्हिडीओ जाहिराती आणि स्पॉन्सरशिप ग्राफिक्ससारख्या तृतीय पक्ष जाहिरातींचा समावेश आहे.
हिंसा आणि सुरक्षिततेबद्दल बोलताना एलॉन मस्क म्हणाले की, आता यूजर्स कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध हिंसाचाराची धमकी देऊ शकणार नाहीत. आता प्लॅटफॉर्मचा वापर दहशतवाद किंवा हिंसक कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी बंद करण्यात येणार आहे. यासोबतच एलॉन मस्क पुढे म्हणाले की, जर कोणी युजर असे करताना आढळले तर त्याचे अकाउंट त्वरित बंद केले जाईल.
ट्विटरमध्ये करण्यात आलेले बदल
- एलॉन मस्क यांनी ट्विटरला सुरक्षित व्यासपीठ बनवण्यासाठी त्यात अनेक मोठे बदल केले आहेत.
- अलीकडेच, एलॉन मस्क यांनी सुरक्षा नियमांमध्ये बदल केले आहेत आणि दिशाभूल करणारे आणि बनावट ओळखीसह अनेक नवीन नियम जोडले आहेत.