मुक्तपीठ टीम
ट्विटरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण ट्विटर आता एक सुरक्षित आणि स्वच्छ अॅप बनत आहे. यापुढे ट्विटरवर अपशब्द वापरता येणार नाही. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म लवकरच सेफ्टी मोड लाँच करत आहे. शिवराळ भाषा वापरली तर, त्या व्यक्तीचे अकाउंट ब्लॉक केले जाईल. ट्विटर त्यांचे खाते सात दिवसांसाठी ब्लॉक करेल. ट्विटरवर असभ्यता आणि ट्रोलिंगची संख्या झपाट्याने वाढत आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ट्विटर एक नवीन फिचर लाँच करणार आहे.
ट्विटरचे सेफ्टी मोड फिचर
- ट्विटरने आयओएस आणि अॅंड्राईडच्या यूजर्ससाठी एक नवीन सुरक्षा वैशिष्ट्य आणत आहे.
- सध्या निवडक यूजर्ससाठीचे हे फिचर लवकरच सर्व लोकांसाठी सुरु केले जाईल.
- मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा येणारा नवीन सेफ्टी मोड सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषेत असेल.
- कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.
- ट्विटरने म्हटले आहे की, “नवीन फिचर वापरकर्त्यांना भाषेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल.
Introducing Safety Mode. A new way to limit unwelcome interactions on Twitter. pic.twitter.com/xa5Ot2TVhF
— Twitter Safety (@TwitterSafety) September 1, 2021
ट्विटरचा सेफ्टी मोड कशाप्रकारे करणार कार्य?
- ट्विटर सुरुवातीला द्वेषयुक्त भाषण करणाऱ्या अकाउंट्सला 7 दिवसांसाठी बंद करेल.
- तसेच एक नोटिफिकेशन पाठवले जाईल.
- हे फिचर वापरण्यासाठी, आपल्याला सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि ते चालू करावे लागेल.
- यानंतर, ट्विटर कन्टेंट आणि प्रतिसादकर्त्यांचे संबंधही लक्षात घेईल.
- मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, जर वापरकर्त्यांनी खाते फॉलो केले असेल. ज्यामुळे बरेच संभाषण होते. मग अशी खाती ब्लॉक केली जाणार नाहीत.
- सेटिंग्ज पर्यायाच्या सेफ्टी आणि प्रायव्हसी विभागातून सेफ्टी मोड चालू केला जाऊ शकतो.