Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकांनी श्रद्धांजली वाहिली…अभिनेत्रीनं मुंबई पोलिसांना सांगितलं “मी जिवंत आहे!” नेमका घोळ काय?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Senior Actress Veena Kapoor

मुक्तपीठ टीम

सध्या व्हायरल होणाऱ्या बातम्यांमुळे अनेकवेळा घोळ होतो. लोक त्यावर विश्वासही ठेवतात. त्यामुळे त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. अशीच एक घटना नुकतीच घडली. टीव्ही क्षेत्रातील जेष्ठ अभिनेत्री वीणा कपूर यांची हत्या झाल्याची एक धक्कादायक बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्यांच्या मुलानेच त्यांची हत्या केल्याचे म्हटले जात होते. प्रॉपर्टीसाठी मुलाने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत होते. परंतु, अभिनेत्री वीणा कपूर यांनी स्वत: याबाबत मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपण जिवंत असल्याचा दावा केला आहे.

वीणा कपूर यांच्या हत्येमागील गूढ काय आहे? जाणून घ्या

  • ज्यावेळी वीणा कपूर यांनी स्वत: पोलिसांना तक्रार केली त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटले.
  • ही हत्या टीव्ही अभिनेत्री वीणा कपूरची नसून मुंबईच्या जुहू भागात वीणा कपूर असे नाव असणाऱ्या एका मृत महिलेची आहे.
  • या मृत महिलेच्या मुलाचे नाव सचिन कपूर आहे आणि त्याने त्याची आई वीणा कपूरची हत्या केली आहे.
  • दोन्ही महिलांच्या एकाच नावामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि ते अभिनेत्री वीणा कपूरला मृत समजू लागले.
  • अशा परिस्थितीत सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्यांच्या मुलालाही ट्रोल करण्यात आले.
  • आता अभिनेत्री वीणा कपूरच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी लोकांविरोधात तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

खोट्या बातम्यांमुळे अभिनेत्री वीणा कपूर दुखावल्या!

आपण जिवंत असल्याची तक्रार अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलिसांकडे नोंदवली असून तिच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली जात आहे. सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहताना लोक त्यांच्या मुलाचा अपमान करत आहेत, त्यामुळे त्या दुखावल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

अभिनेत्री वीणा कपूरने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मी अस्वस्थ आहे. माझा फोटो व्हायरल झाला असून लोक मला श्रद्धांजली वाहत आहेत. मला लोकांचे फोन येत आहेत आणि मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मला सर्वांना सांगायचे आहे की माझ्या मुलाने मला मारले नाही. माझ्या मृत्यूची चुकीची बातमी पसरवली गेली. या खोट्या अफवेमुळे मला काम मिळणेही बंद झाले आहे. ज्या महिलेची हत्या करण्यात आली तिचे नाव वीणा कपूर आहे, हे लक्षात घ्यावे.”


Tags: Juhu Policemuktpeethmumbai policeMurder NewsSenior Actress Veena KapoorViral Fake Newsघडलं-बिघडलंजुहू पोलीसजेष्ठ अभिनेत्री वीणा कपूरमुक्तपीठमुंबई पोलीसव्हायरल फेक बातमीहत्येची बातमी
Previous Post

देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र! : नाना पटोले

Next Post

डिसेंबरच्या ‘या’ दिवशी वर्षातील सर्वात मोठी रात्र, कोणता दिवस ते जाणून घ्या…

Next Post
Winter Solstice

डिसेंबरच्या 'या' दिवशी वर्षातील सर्वात मोठी रात्र, कोणता दिवस ते जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!