मुक्तपीठ टीम
क्षयरोग म्हणजेच टीबी रोगावरील उपचारांचा कालावधी आता सहा महिन्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. सध्या हा कालावधी १८ ते २४ महिन्यांचा आहे. संशोधकांनी प्रीटोमॅनिडसह तीन औषधांवर क्लिनिकल अभ्यास केला आहे, ज्यामध्ये औषधाचा प्रभाव ९० टक्क्यांहून अधिक आहे. प्रीटोमॅनिड, बेडाक्वीलाईन आणि लाइनझोलिड हे औषध एकत्र दिले जाऊ शकते. हे मिश्रण बीपीएएल म्हणून ओळखले जाते.
उपचार कालावधी कमी झाल्याने फायदा!
- द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे नमूद केले आहे की नवीन औषध १८ ते ४ महिन्यांचा उपचार कालावधी सुमारे सहा महिन्यांनी कमी करू शकतो.
- जुन्या सर्व तोंडी औषधांच्या पद्धतीमध्ये, रुग्णाला दररोज सुमारे १४ वेगवेगळी क्षयरोगविरोधी औषधे घ्यावी लागत होती.
- आता ही संख्या तीनपर्यंत मर्यादित असेल.
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या क्षयरोग नियंत्रण शाखेशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की औषधाच्या यशस्वी परिणामांची माहिती आहे, परंतु भारतात परवानगी देण्यापूर्वी स्वदेशी अभ्यासाची अट पूर्ण करावी लागेल.