Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदिवासी उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी ट्रायफेडचे प्रयत्न

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
TRIFED

मुक्तपीठ टीम

भारतातील आदिवासींकडे असलेली पारंपरिक कलेतील पारंगतता अनेक अनोख्या कलाकृतींना जन्म देते. सर्वाधिक अनोख्या कलाकृतींच्या निर्मितीची उपजत क्षमता आदिवासींकडे आहे. आदिवासी समुदायाची ही क्षमता जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित म्हणजेच ट्रायफेड प्रयत्न करीत आहे. त्याचा एक भाग म्हणून जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळवून देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

 

आदिवासी स्रोत असलेल्या विविध उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळवून विक्री करणे या माध्यमातून विशिष्ठ भौगोलिक वैशिष्ठ्ये असलेल्या कृषीमाल, नैसर्गीक उत्पादने वा संबधित प्रदेशाची वैशिष्ट्ये असणारी मानवनिर्मित उत्पादने यांचे महत्व जपण्यासाठी व वृद्धींगत करण्यासाठी ट्रायफेड कटीबध्द असेल. यामुळे अविश्वसनीय भारतातील समृद्ध खजिना जपला जाईल.

 

याबाबतीत जागतिक पातळीवर पुढाकार नोंदवत उच्चायुक्त कार्यालयात आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादितच्या सहकार्याने आत्मनिर्भर भारत कक्ष तयार करण्यात आला आहे. भारतभरातील आदिवासीं शतकानुशतके तयार करत असलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळवून देण्याचा उद्देश यामागे आहे.

 

 

आदिवासी वारली पेंटिंग ❤️

चित्रकार: कांतीलाल पेंटर pic.twitter.com/5dbNm1qubB

— Pravin Gavit  (@praveengavit11) July 17, 2021

 

सध्या ट्रायफेडने आदिवासीकडून निर्मित वा निर्मितीत अदिवासींचा सहभाग असलेल्या भारतीय मानांकन अर्ज केलेल्या तीनशेंहून जास्त उत्पादनांपैकी भौगोलिक मानांकनप्राप्त ५६ उत्पादनांचे विपणन त्यांच्या १४१ भारतीय आदिवासी विक्री केंद्रांच्या जाळ्यामार्फत तसेच इकॉमर्स मंचावरून सुरू केले आहे.

 

याशिवाय, देशभरातील अनेक राज्यांमधून असलेल्या स्थानिक कार्यालयातून आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित म्हणजेच ट्रायफेड आजून १७७ उत्पादनांना भौगोलिक मानांकन देण्यावर काम करत आहे. यातील १० उत्पादने महाराष्ट्रात आहेत.

 

भौगोलिक मानांकनाचे अंगिकारलेले हे उद्दिष्ट आजादी का अमृतमहोत्सव म्हणजेच भारत@७५ तसेच वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या आवाहनाशी सुसंगत आहे.

 

भौगोलिक मानांकन कल्पनेला मजबूती देण्यासाठीचे उपक्रम

TRIFED – PMO – LBSNAA

आदिवासी उगमस्थळ असलेल्या उत्पादनांना चालना व त्यांचे विपणन तसेच त्यांचा ब्रॅण्ड होऊन त्यामार्फत आदिवासी कलाकारांचे सक्षमीकरण होण्यासाठी आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादितने पंतप्रधान कार्यालयाशी भागीदारी केली आहे.

 

ट्रायफेड – नाबार्ड

आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डने अश्या वस्तूंच्या विनियोगतून उपलब्ध होणाऱ्या संसाधनांना सामायिक करत भौगोलिक मानांकनाला वेग व बळकटी देण्याच्या दिशेने हातमिळवणी केली आहे.

 

ट्रायफेड – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

ट्रायफेड म्हणजेच आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित आणि परराष्ट्र मंत्रालयाने एकत्र येत समृद्ध आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांना भारतीय वकिलातींच्या माध्यमातून वैश्विक व्यासपीठ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अनेक अनोख्या आदिवासी उत्पादनांना प्रोत्साहन व त्यांचे विपणन करण्याच्या दृष्टीकोनातून ट्रायफेडने ओटावा, कुवैत, बँकॉक, क्रोएशिया या ठिकाणच्या भारतीय वकिलातीत ‘आत्मनिर्भर कक्ष ’ सजविला आहे.

 

वारली कलेला जीआय टॅगिंग

महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या उत्तरेकडील वारली आदिवासी जमातीद्वारे अभ्यासलेली वारली कला निसर्गाने प्रेरित असून यात तांदळाचे पीठ,पाणी आणि डिंक यांचे मिश्रण करुन तयार केलेली चित्रे आहेत. महाराष्ट्राच्या या वारसा कलेचे संरक्षण करण्यासाठी वारली कलेला जीआय टॅग मिळाले आहे.

 

महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या उत्तरेकडील वारली आदिवासी जमातीद्वारे अभ्यासलेली वारली कला निसर्गाने प्रेरित असून यात तांदळाचे पीठ,पाणी आणि डिंक यांचे मिश्रण करुन तयार केलेली चित्रे आहेत. महाराष्ट्राच्या या वारसा कलेचे संरक्षण करण्यासाठी वारली कलेला जीआय टॅग मिळाले आहे.

— Maharashtra Tourism (@maha_tourism) May 8, 2021

 

पाहा व्हिडीओ:


Tags: PM Narendra modiआत्मनिर्भर भारतट्रायफेडपरराष्ट्र व्यवहार मंत्रालयभारत@७५
Previous Post

आयआरसीटीसीचं मालदिव पॅकेज, जादुई सौंदर्याचा घ्या आस्वाद!

Next Post

महिंद्रा अँड महिंद्राचे युवो टेक+ रेंजचे ट्रॅक्टर भारतात लॉन्च, मातीनुसार वेगाची सोय

Next Post
tractor

महिंद्रा अँड महिंद्राचे युवो टेक+ रेंजचे ट्रॅक्टर भारतात लॉन्च, मातीनुसार वेगाची सोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!