मुक्तपीठ टीम
आत्तापर्यंत अनेक रॅम्प वॉक आपण पाहिले असतील, मात्र एक मॉडल आईने आपल्या बाळाला ह्रदयाशी कवटाळून रॅम्प वॉक केला आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये ही संपूर्ण घटना पाहायला मिळाली. अलिशा गौतम ओराव असं या मॉडेल आईचे नाव आहे. या मॉडेल आईचा रॅम्प वॉक पाहून उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. बाळासोबत रॅम्पवर चालतानाचा फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आईचा मुलासोबतचा रॅम्प वॉक लोकांना आवडला आहे.
कोण आहे अलिशा गौतम ओराव?
- मॉडेल अलिशाने तिचे शालेय शिक्षण द एशियन स्कूल डेहराडूनमधून केले आणि NIFT गांधीनगरमधून फॅशनमध्ये पदवी प्राप्त केली.
- शालेय शिक्षणादरम्यान अलिशा अॅथलेटिक्समध्ये सक्रिय होती.
- फुटबॉल संघाचा कर्णधार राहिली आहे.
- व्हॉलीबॉलमध्ये राष्ट्रीय खेळाडू होती.
- २०२१ मध्ये तिने आदिवासी सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि मिसेस कॅटेगरी मध्ये फर्स्ट रनरअप होती.
- २०१५ मध्ये तमायरा बुटीक सुरू केले, २०२० मध्ये तमायरा क्लाउड किचन सुरू केले.
- आतापर्यंत तिने १२ फॅशन शोमध्ये भाग घेतला आहे. तिला दोन मुली आहेत, मी घर आणि बाहेर चांगले बघते. महिलांनो, घर आणि घराबाहेर समतोल साधा आणि तुमची आवड नेहमी जपा.
अलिशाच्या स्वप्नांना कुटुंबाची साथ-
- तिचे आजोबा बंदी ओराव हे आयपीएस, राजकारणीही आहेत.
- वडील डॉ. प्रकाशचंद्र ओराव हे आदिवासी संशोधन संस्थेचे संचालक आणि राज्यपालांचे ओएसडी राहिले आहेत.
- तिचे वडील खूप कडक होते पण तिच्या स्वप्नाच्या मध्ये ते कधीच आले नाही, तिच्या आवडीला त्यांचा पाठिंबा असल्याचे तिने सांगितले.
- आई सरस्वती ओराव या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अलिशाची आई सरस्वती ओराव यांनी सांगितले की, अलिशा ही एकेकाळी स्वत: नोकरी करत होती.
- अलिशाने पोलिस दलात जावे अशी कुटुंबाची इच्छा होती पण अलिशाला मॉडेलिंगच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती आणि त्यात ती यशस्वीही होत आहे.