Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“माझ्या आयुष्याची कलाकृती भस्मसात झाली…” शिल्पकार विनोद येलारपूरकरांची आर्त हाक

कलाकार जिद्दीनं पुन्हा उभा ठाकणार, राखेतून कलेचा फिनिक्स झेपावणार! द्या साथ!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
fire (2)

मुक्तपीठ टीम

“मोठ्या कष्टाने आयुष्यभर साकारलेली कलाकृती जळून खाक झाली. आजवर साकारलेल्या अनेक शिल्पे, मूर्ती, साचे, मोल्ड यासह सगळे काही जळाले. या घटनेने माझी कलेची तपश्चर्या भस्मसात झाली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात ओढवलेल्या या संकटामुळे सगळेच हरवून बसलो आहे. पण पुन्हा जिद्दीने उभा राहायचे आहे, त्यात आपली मोलाची साथ हवी आहे,” अशी भावना प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार विनोद येलारपूरकर यांनी व्यक्त केली.

गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास येलारपूरकर यांचा सिंहगड पायथ्याला गोरेखुर्द येथे नव्याने उभारलेला स्टुडिओ आगीत जळून खाक झाला. शिल्पकलेतून साकारलेली अनेक शिल्पे, देखावे आणि साचे (डाय), मोल्ड यासह अनेक मौल्यवान वस्तू या आगीत जळाल्या. कोरोनामुळे आधीच कलाकारांवर संकट असताना अनपेक्षित घडलेल्या या दुर्घटनेमुळे विनोद येलारपूरकर यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधाराची गरज आहे. याच संदर्भात शिल्पकार येलारपूरकर पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांना धीर देण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या असून, या संस्थांचे प्रतिनिधी शिल्पकार विवेक खटावकर, आनंद सराफ, शिरीष मोहिते, सुभाष जिरगे, प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते. जेजे स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्या माध्यमातून आर्ट लाईन ग्रुपतर्फे एक लाखाची, तर शिरीष मोहिते यांनी सेवा मित्र मंडळातर्फे ११ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

विनोद येलारपूरकर म्हणाले, “गेल्या दोन महिन्यांपासून या जागेत स्टुडिओ उभारण्याचे काम सुरु होते. पुढील दोन-तीन दिवसात स्टुडिओचे पूजन करून तेथून काम सुरु होणार होते. त्यामुळे सर्व शिल्पे, मोल्ड व अन्य साहित्य तेथे हलवले होते. काल अचानक लागलेल्या आगीत हे साहित्य जळाले. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ५०-६० शिल्पे, देखाव्यांसाठी लागणाऱ्या मुर्ती, महापुरुषांचे पुतळे, इतर फायबरचे साहित्य जळाले. सात-आठ लाख रुपये खर्चून हा स्टुडिओ उभारला होता. २५-३० लाखाचे इतर साहित्य होते. असे सगळे मिळून जवळपास ३५-४० लाखांचे नुकसान झाले आहे.”

शहरातील सर्व गणेश मंडळे, कलाकार येलारपूरकर यांच्या पाठीशी उभे राहतील, असे आनंद सराफ व विवेक खटावकर यांनी सांगितले. विविध सामाजिक संस्था, कलेला प्रोत्साहान देणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून मदतनिधी उभारून येलारपूरकर यांना आधार देऊ, असे आश्वासन शिरीष मोहिते व प्रसाद खंडागळे यांनी दिले. जेजुरी संस्थान व अन्य देवस्थानांशी याबाबतीत संपर्क करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वीट, सिमेंट, पत्रे व स्टुडिओच्या उभारणीसाठी लागणारे अन्य साहित्यरूपी मदत करण्याचे आवाहन सुभाष जिरगे यांनी केले.

विनोद येलारपूरकर यांचे कार्य
जेजे स्कुल ऑफ आर्ट संस्थेतून शिक्षण घेतलेल्या शिल्पकार विनोद येलारपूरकर यांनी गेल्या ३० वर्षात पुण्यातील गणेशोत्सवात देखावे, शिल्पे साकारण्याचे काम केले आहे. शहराच्या अनेक भागात त्यांनी विविध शिल्पे उभारली आहेत. त्यामध्ये ओंकारेश्वर चौकातील वारकऱ्यांचे शिल्प, नाना पेठेतील वारीचे शिल्प, संत कबीर चौकातील त्रिमितीय शिल्प, डुल्या मारुती चौक व सेव्हन लव्ह्ज चौकातील ‘मुलगी वाचवा’चे शिल्प, पासोड्या-निवडुंगा विठोबा मंदिराच्या कमानी, म्युरल्स आदी गोष्टी त्यांनी साकारल्या आहेत.

येलारपूरकर यांना मदत करण्यासाठी
कलाकृती ही कलाकाराचा आत्मा असतो. तीच कलाकृती आगीत भस्मसात झाल्याने येलारपूरकर यांच्यावर मोठा आघात झाला आहे. त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे. ज्यांना येलारपूरकर यांना अर्थसहाय्य किंवा वस्तुरूप मदत करायची असेल, त्यांनी विनोद येलारपूरकर (९८२२९२४४२२) यांच्याशी संपर्क करावा. खात्याचे नाव : विद्या आर्टस्, खाते क्रमांक : ०५३०२११०००००२९३, आयएफएससी कोड : ABHY००६५११०, बँकेचे नाव : अभ्युदय को-ऑप. बँक, सिंहगड रस्ता, पुणे यावर अर्थसहाय्य करावे.


Tags: आगपत्रकार परिषदविनोद येलारपूरकरसिंहगडस्टुडिओ
Previous Post

#व्हाअभिव्यक्त “जीव धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर-नर्सचे मानधन कापू नका! परवडणार नाही!!”

Next Post

“राज्यात कायदा – सुव्यवस्थेचा बोजवारा, भ्रष्टाचाराचा कळस”

Next Post
narayan rane

"राज्यात कायदा - सुव्यवस्थेचा बोजवारा, भ्रष्टाचाराचा कळस"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!