Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राज्यात कायदा – सुव्यवस्थेचा बोजवारा, भ्रष्टाचाराचा कळस”

नारायण राणेंची महाविकास आघाडीवर जोरदार टीका

April 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

कोरोनाला अटकाव करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महाआघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

राणे म्हणाले की, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी लॉकडाऊन लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतावीळ झाले आहेत. वेगाने लसीकरण करण्यासाठी तसेच रुग्णालयात मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध करून देण्यासाठी या सरकारकडे नियोजन नसल्याने रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

‘शिस्त पाळा नाहीतर लॉकडाऊन लावू’,अशी धमकीच हे सरकार वारंवार देत आहे. पण या लॉकडाऊनमुळे समाजातल्या विविध घटकांचे किती मोठे नुकसान होते याची कल्पनाही मुख्यमंत्र्यांना नाही. घराबाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेच्या वेदना कशा कळणार असा सवालही त्यांनी केला.

राणे म्हणाले की, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाजे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रावरून सत्ताधारीच जनतेकडून वसुली करत असल्याचे दिसते आहे.

राज्यात कोरोना आणि गुन्हेगारीसोबतच भ्रष्टाचारही प्रचंड प्रमाणात बोकाळला आहे. प्रत्येक खात्यामध्ये, प्रत्येक निवीदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागेपासून ते विविध विभागाच्या परवानग्या मिळवण्यासाठी ज्यांनी मुख्यमंत्री असताना सर्वाधिक मेहनत घेतली त्या देवेंद्र फडणवीस यांना आघाडी सरकारने स्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचे आमंत्रणही न देण्याचा संकुचितपणा दाखवला.


Tags: coronaNarayan raneनारायण राणेभाजपविश्वास पाठक
Previous Post

“माझ्या आयुष्याची कलाकृती भस्मसात झाली…” शिल्पकार विनोद येलारपूरकरांची आर्त हाक

Next Post

लॉकडाऊन नाही, पण इशारा! टीका करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले!!

Next Post
uddhav thackeray appeal 2-4-21

लॉकडाऊन नाही, पण इशारा! टीका करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!