Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वेचे प्रवासी आता यात्री ॲपद्वारे लोकल ट्रेनचे लोकेशन करू शकतात ट्रॅक

September 6, 2026
in उपयोगी बातम्या
0
Track Central Railway location through Yatri App

मुक्तपीठ टीम

मध्य रेल्वेच्या लोकलना विलंब हा १२ महिने प्रवाशांच्या नशिबी अटळ आहे. यावरुन सोशल मिडीयावर ‘म.रे’वर वारंवार होणा-या टिकेमुळे ‘यात्री मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’वर लोकलच्या थेट लोकेशनची माहिती मिळू शकेल.

713-Yatri app Demo-2

हे अ‍ॅप दैनंदिन उपनगरीय प्रवाशांसाठी रेल्वे धावण्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी आणि प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. विशेषत: इतर कोणत्याही कारणांमुळे किंवा मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याच्या काळात ट्रेन रद्द करणे किंवा विशेष गाड्या चालवल्याबद्दल त्यांना माहिती मिळू शकते.

‘लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग’ प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आणि सुलभ प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यात मदत करेल, अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी १३ जुलै रोजी ‘यात्री’च्या या वैशिष्टयांच्या प्रात्यक्षिकवेळी दिली. सर्व उपनगरीय डब्यांवर बसवलेली जीपीएस उपकरणे आणि लोकलचे रिअल टाइम लोकेशन मिळवण्यासाठी विकसित केलेला ‘अल्गोरिदम’ वापरकर्त्यांना नकाशावर थेट ट्रेनचे स्थान पाहण्यास आणि ट्रेनचे चिन्ह हलताना पाहण्यासाठी  सक्षम असेल.

डेटा दर १५ सेकंदांनी ‘आॅटो रिफ्रेश’ होतो आणि गाडीचे अपडेट केलेले ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना रिफ्रेश बटण क्लिक करावे लागेल. वापरकर्त्यांना लोकलच्या आगमनाबाबत वेळेवर सूचना मिळतील. ही सुविधा मेन, हार्बर आणि ट्रान्सहार्बर व आणि बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्गांवरील  गाड्यांच्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

थेट अपडेट, लोकलचे अपडेट केलेले वेळापत्रक, उपनगरीय गाड्यांचे तिकीट भाडे तपशील, स्त्रोत आणि नियोजित केलेली स्थानके प्रविष्ट करून प्रवासाचे नियोजन, मेल/ एक्सप्रेस ट्रेनची माहिती, प्रवाशाचे स्थळ, ट्रेन आणि पीएनआर स्थिती याची सद्यस्थिती, मुंबई विभाग, मध्य रेल्वेवरील स्थानकांवर स्थानक निहाय सुविधा पाहणे, रेल्वे आणि वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक, आवडत्या (नियमित) गाड्या  आणि मार्गांवर अ‍ॅलर्ट सेट करणे, एका टॅपमध्ये ‘एसओएस’साठी  रेल्वे आपत्कालीन स्थितीशी संपर्क साधणे, मेट्रो, मोनो, फेरी आणि बस माहिती आणि वेळापत्रक, वापरकर्ते अभिप्राय आणि सूचना देण्यासाठी हे ‘अ‍ॅप’ अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप’ स्टोअरवर उपलब्ध आहे, असे लाहोटी यांनी सांगितले.

 


Tags: ‘लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग’Central RailwayMumbai Local TrainYATRI APPमध्य रेल्वेने मुंबईयात्री ॲपलोकल ट्रेन
Previous Post

“शिंदेसाहेब, मेळघाटात काहीच नाही ओके! पाचडोंगरी मृत्यूंसाठी दूषित पाणी नव्हे, तर दूषित व्यवस्था जबाबदार!”

Next Post

शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच, मंत्र्यांच्या नावांवर श्रेष्ठींचं शिक्कामोर्तब!

Next Post
Maharashtra Cabinet Expansion Likely After Presidential Polls

शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच, मंत्र्यांच्या नावांवर श्रेष्ठींचं शिक्कामोर्तब!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!