Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच, मंत्र्यांच्या नावांवर श्रेष्ठींचं शिक्कामोर्तब!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Maharashtra Cabinet Expansion Likely After Presidential Polls

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन आता १५ दिवस झाले. पण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही ते दोघेच होते. मंत्र्यांच्या इतर खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. पण आता त्या लवकरच भरल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतर लगेच १९ जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या १९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींच्या संमतीनं मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

१९ जुलै रोजी होणार मंत्रिमंडळ विस्तार!!

  • १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक होणार आहे.
  • त्याच्या दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे.
  • या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांची इच्छा आहे.
  • विशेषत: शिवसेना सोडून शिंदे गटात आलेल्या आमदारांमध्ये काही तरी मिळावं ही भावना प्रबळ आहे.
  • त्यातही पुन्हा आधीच्या सत्तेत मंत्री असणाऱ्या सर्वांना पदं द्यावीच लागणार आहेत.
  • त्यामुळे वाट्याला आलेल्या मंत्रिमंडळातील जागांवर आपल्या समर्थकांची निवड करण्याचं आव्हान मुख्यमंत्री शिंदेंपुढे आहे.
  • मंत्रिमंडळ निवडीसाठी शिंदे आणि फडणवीस यांच्यात राज्यात तसेच दिल्लीतही बैठका पार पडल्या आहेत.
  • दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचे कळते.
  • या बैठकांमध्ये मंत्र्यांची नावे नक्की झाली असून १९ जुलै रोजी शपथविधी पार पडणार असण्याची शक्यता आहे.

भाजपा आणि शिंदे गटात कशी होणार सत्तेची वाटणी?

  • शिंदे मंत्रिमंडळात एकूण ३८ मंत्री असण्याची शक्यता आहे.
  • भाजपाला २५ मंत्रिपदे, तर शिंदे गटाला १३ मंत्रिपदांची शक्यता आहे. शिंदे गटाला जास्त जागा मिळण्याचीही शक्यता आहे.
  • त्याचबरोबर अपक्ष आमदारांनाही मंत्री केलं जाऊ शकतं.
  • भाजपा पक्षाकडून बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
  • भाजपा गृहखातं, अर्थखातं, महसूल खातं ही खाती स्वत:कडेच ठेवणार आहे.
  • आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे भाजपाच्या अनेक अनुभवी नेत्यांचा विरस होणार आहे.

Tags: BJPCm Eknath Shindedevendra fadanvisMaharashtraShivsenaउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिंदे-फडणवीस मंत्रिमंडळशिवसेना
Previous Post

रेल्वेचे प्रवासी आता यात्री ॲपद्वारे लोकल ट्रेनचे लोकेशन करू शकतात ट्रॅक

Next Post

श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती, तीच स्थिती आज भारताची! – अतुल लोंढे

Next Post
atul londh

श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती, तीच स्थिती आज भारताची! - अतुल लोंढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!