मुक्तपीठ टीम
टोयोटाने आपली नवीन टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर लाँच केली आहे. ही नवीन आणि UV FWD (फ्रंट-व्हील-ड्राइव्ह) आणि AWD (ऑल-व्हील-ड्राइव्ह) सिस्टम फिचर्ससह येईल.
टोयोटा हायरायडर केबिन ही भन्नाट वेगळी आहे.
- हायराइडरच्या टीझरमध्ये हायब्रीड एसयुव्हीचे काही इंटीरीअर समोर आले आहेत.
- टीझर केबिनच्या आत एक ड्युअल टोन थीम आहे.
- केबिनचा खालचा अर्धा भाग गडद राखाडी रंगाचा आहे.
- दरवाजाचे हँडल क्रोम केलेले आहेत.
- एसी व्हेंट देखील क्रोम असल्याचे दिसून येते.
इंजिन ऑप्शन
- नवीन हायरायडर माईल्ड आणि स्ट्रोंग हायब्रिड इंजिनसह सादर केली जाईल.
- ही दोन पेट्रोल इंजिनसह ऑफर केली जाईल
- मारुतीचे १.५-लिटर केआय5सी ड्युअलजेंट माईल्ड हायब्रीड तंत्रज्ञान आणि टोयोटाचे १.५१ पेट्रोल मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान.
- पहिले इंजिन १०३पीएस पॉवर आणि १३७एनएम पीक टॉर्क निर्माण करते.
- या कारचे इंजिन १६ पीएस पॉवर देऊ शकते.
टोयोटा हायराइडर ए डब्ल्यु डी ऑटोमॅटिक
- ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि १.५एल माईल्ड हायब्रिड युनिटसह स्वयंचलित ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर समाविष्ट आहे.
- मजबूत हायब्रिड मोटर ई-सीव्हीटी युनिटशी जोडली जाईल.
- फ्रंट व्हील-ड्राइव्ह आणि सेल्फ-चार्जिंग सिस्टीम केवळ स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेनसह दिली जाईल.
- ए डब्ल्यु डी सिस्टम केवळ माईल्ड संकरित तंत्रज्ञानासह ऑफर केली जाईल.