मुक्तपीठ टीम
पाच राज्यातील निवडणुकींच्या निकालानंतर आता ग्राहकांसाठीचा दिलासाचा काळ संपला आहे. आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दराने उसळी मारली आहे. तर आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलची किंमत ३५ ते ४४ पैसे आणि डिझेलची किंमत ४५ ते ५१ पैसे प्रति लीटरने वाढली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आता पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तेथे पेट्रोल १०१.८५ रुपये आणि डिझेल ९४.०५ रुपये प्रति लीटरने विक्री केले जात आहे. महाराष्ट्रातही परभणीत शंभरीपार झाले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल-डिझेलचे दर
• मुंबईमध्ये पेट्रोल ९७.३४ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८८.४९ रुपये प्रतिलीटर
• नागपूरमध्ये पेट्रोल ९६.९५ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८७.०१ रुपये प्रतिलीटर
• पुण्यामध्ये पेट्रोल ९६.७६ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८६.७९ रुपये प्रतिलीटर
• ठाण्यामध्ये पेट्रोल ९७.०८ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८८.३१ रुपये प्रतिलीटर
• कोल्हापूरमध्ये पेट्रोल ९७.२७ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८७.३२ रुपये प्रतिलीटर
• अकोलामध्ये पेट्रोल ९७.१३ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८७.१३ रुपये प्रतिलीटर
• अमरावतीमध्ये पेट्रोल ९८.७९ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रतिलीटर
• बुलढाणामध्ये पेट्रोल ९८.३२ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८८.९२ रुपये प्रतिलीटर
• रायगडमध्ये पेट्रोल ९७.०१ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८६.७९ रुपये प्रतिलीटर
• नांदेडमध्ये पेट्रोल ९९.६७ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८९.४१ रुपये प्रतिलीटर
• परभणीमध्ये पेट्रोल ९९.७४ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८९.४५ रुपये प्रतिलीटर
• चंद्रपूरमध्ये पेट्रोल ९७.३४ रुपये प्रतिलीटर आणि डिझेल ८७.१८ रुपये प्रतिलीटर
• दिल्लीमध्ये पेट्रोल ९०.९९ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८१.४२ रुपये प्रतिलीटर
कसे ठरतात पेट्रोल-डिझेलचे दर?
• पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
• जर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकले गेले तर डिझेल आणि पेट्रोल प्रतिलिटर २७ रुपयांनी मिळू शकते.
• परंतु केंद्र किंवा राज्य सरकार दोघांनाही हा कर काढून टाकता येणार नाही.
• कारण सर्वात जास्त महसूल यातून सरकारना मिळते.
• इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांची समिक्षा करा.
• त्यानंतर दर रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर घोषित करतात.