Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक,धार्मिक सर्व कार्यक्रमांवर बंदी!” – मुख्यमंत्री ठाकरे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
CM Uddhav Thackeray mask

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्रात सोमवारपासून राजकीय, सामाजिक,धार्मिक अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाहीत. तसेच मिरवणुका, मोर्चे काढता येणार नाही. तसेच यात्रांनाही मनाई असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऑनलाइन लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना “राज्यात लॉकडाऊन पाहिजे की नको, ते तुम्हीच सांगायचे आहे. म्हणजे तुम्ही आता कसे वागता ते आम्ही पाहू आणि तुमच्या वागण्यावर लॉकडाऊनचा निर्णय घेणार. जे मास्क घालून फिरतात त्यांना लॉकडाऊन नको, जे मास्कविना फिरतात, त्यांना लॉकडाऊन पाहिजे, असे समजले जाईल” अशी घोषणाही केली.

 

राजकीय पक्ष वाढवा, कोरोना नको!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजकीय पक्षांनाही बजावले आहे की, “तुम्ही तुमचा राजकीय पक्ष नक्की वाढवा, पण कोरोना वाढवू नका.”

 

मुख्यमंत्र्यांचे संदेश

  • “मास्क वापरा-लॉकडाऊन टाळा”
  • “जबाबदारीनं वागा, लॉकडाऊन टाळा”
  • “कोरोनाविरोधात आता मी जबाबदार” असे प्रत्येकाने मानावे

असे संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

दुसरी लाट काही दिवसात कळेल

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कोरोना डोके वर काढत आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे आता आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. कोरोनाची दुसरी लाट राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

राज्यातील कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. या लाइव्हमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांनी आवश्यक पावलं उचलावीत, पण अचानक काही जाहीर करू नये, अशी सूचनाही केली.

 

आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार सोमवारपासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर बंदी असणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी राजकीय पक्षांनाही बजावले आहे की, तुम्ही तुमचा राजकीय पक्ष नक्की वाढवा, पण कोरोना वाढवू नका.

 

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

  • कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाही आवडणार नाही. पण त्यासाठी आपल्याला जबाबदारीनं वागावं लागेल.
  • पुढील दोन महिन्यात आणखी एक- दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत.
  • लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाहीत, हे लक्षात घ्या.
  • लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झाले आहे.
  • मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे.
  • शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा.
  • नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बजावले आहे.

Previous Post

पत्नी तंबाखू खाते म्हणून घटस्फोट मिळणार नाही! न्यायालयाने पतीला ठणकावले!!

Next Post

कोरोना लसीकरणानंतर रोगप्रतिकार शक्‍ती कशी वाढवावी?

Next Post
covid vaccine safety teaser

कोरोना लसीकरणानंतर रोगप्रतिकार शक्‍ती कशी वाढवावी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!