Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ममता बॅनर्जी २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध वाराणसीतून लढणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
tmc

मुक्तपीठ टीम

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानानंतर भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रॅली दरम्यान दावा केला की ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पराभूत होत आहेत. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांना प्रत्युत्तर दिले. तृणमूल कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २०२४ मध्ये वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देतील, असा अंदाज बांधला जात आहे.

पंतप्रधान मोदींनी बंगालच्या निवडणूक प्रचारात जयनगरमधील सभेला संबोधित केले. तेथे ते म्हणाले, “दीदी, दुसर्‍या मतदारसंघातून आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या या अफवेत काही सत्य आहे काय?”

तृणमूल काँग्रेसने गुरुवारी उशिरा मोदींना उत्तर देणारे ट्विट केले. “दीदी नंदीग्राम जिंकत आहेत. दुसर्‍या जागेवरुन लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नरेंद्र मोदीजी, पश्चिम बंगालमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. आपल्या खोटे बोलण्याने लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. वाराणसीत तुम्हाला आव्हान दिलं जाईल म्हणून २०२४ मध्ये एक सुरक्षित जागा शोधा.”

 

Didi is winning Nandigram. The question of her fighting from another seat doesn’t arise. @narendramodi Ji, retract from your efforts to mislead people before they see your lies with the end of nomination in WB. Look for a safer seat in 2024, as you will be challenged in Varanasi.

— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 1, 2021

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात भाजपने त्यांचे जुने सहकारी शुभेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे तेथे चुरशीची स्पर्धा आहे. तेथे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणच्या प्रचारसभेत ममता बॅनर्जींबद्दल नरेंद्र मोदींनी दुसरीकडून लढण्याचे विधान जाणीवपूर्वक केल्याचे मानले जाते. परंतु तृणमूल काँग्रेसने थेट वाराणसी लढण्याचं प्रतिआव्हान देत रंगत अधिकच वाढवली आहे. तसे करताना उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्याची मोदींना जाणीव करून देत त्यांच्या भाषणात मांडलेला मुद्दा अफवाच असल्याचे दाखवून दिल्याचे मानले जात आहे.


Tags: तृणमूल काँग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदीपश्चिम बंगालमुख्यमंत्री ममता बॅनर्जींशुभेंदू अधिकारी
Previous Post

सचिन वाझेंबद्दल ‘त्या’ महिलेच्या गौप्यस्फोटातून नवा स्फोट?

Next Post

बंगालात ईडी, तामिळनाडूत आयटी…भाजपाविरोधातील नेत्यांविरोधात कारवाईसाठी निवडणुकीचा मुहूर्त!

Next Post
bangal

बंगालात ईडी, तामिळनाडूत आयटी...भाजपाविरोधातील नेत्यांविरोधात कारवाईसाठी निवडणुकीचा मुहूर्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!