Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

करवाढ, दरवाढ नसलेला ठाणे मनपाचा अर्थसंकल्प! अधिकारी सभागृहात, नगरसेवक ऑनलाइन! विरोधक संतप्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
TMC

मुक्तपीठ टीम

मुंबईसह पाठोपाठ ठाणे मनपाचा वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प गुरुवारी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला. एकूण ३ हजार २९९ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. दरम्यान मनपा अर्थसंकल्प सादरीकरणात अर्थसंकल्प सादरीकरणात गोंधळ पाहायला मिळाला. ठाणे मनपाचं ऑनलाइन अर्थसंकल्प सादरीकरण आणि अर्थसंकल्पाची कॉपीदेखील आधी पूरवली नसल्याने काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , भाजप नेत्यांकडून आक्रमक भूमिका पाहायला मिळाली.

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४५ कोटींनी अर्थसंकल्प वाढला

  • दरम्यान, ठाणे महानगर पालिकेनं २०२२-२३ चा ३ हजार २९९ कोटींचा मूळ अर्थसंकल्प आज आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केला.
  • ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज सादर केला.
  • कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नसलेला वास्तववादी आणि काटकसरीचा अर्थसंकल्प हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्टय आहे.
  • यंदाच्या अर्थसंकल्पाचा आकार तब्बल ५४५ कोटींनी वाढल्याचं दिसून येत आहे.
  • गेल्या वर्षी २ हजार ७५४ कोटी ७६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

 

पुरेशी पार्किंग सुविधा

शहरात पुरेशी पार्किंग सुविधा निर्माण करता यावी यासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

 

ठाण्यात फिल्म इन्स्टिटयूट उभारण्याचा मनपाचा मानस

  • ठाणे शहरात फिल्म इन्स्टिटयूट उभारण्याचा महापालिकेचा मानस असून त्या माध्यमातून चित्रपटसृष्टीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
  • त्यासाठी सदर २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

 

प्रदूषण नियंत्रणासाठी मनपाचे पाऊल…

  • राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत हवा प्रदूषण कमी करणे व हवेची गुणवत्ता वाढणे यासाठी ४८ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
  • त्यातून ठाणे मनपा परिवहन सेवेकरीता ८१ इलेक्ट्रीक बसेसची खरेदी, वागळे इस्टेट स्मशानभूमीमध्ये PNG शवदाहिनी बांधणे, Dust Sweeping मशीन खरेदी करणे, पालापाचोळा कचरा व्यवस्थापनासाठी Horticulture Composting Plant उभारणे, धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी Mist spray machine उभारणी करणे अशी कामे प्रस्तावित आहेत.

Tags: CongressNCPTMCTMC Budgetअर्थसंकल्पकाँग्रेसठाणे मनपाभाजपराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन

Next Post

हिजाबचा वाद: पुढील सुनावणीपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक वेशभूषेवर न्यायालयाची बंदी!

Next Post
sc

हिजाबचा वाद: पुढील सुनावणीपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक वेशभूषेवर न्यायालयाची बंदी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!