Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिजाबचा वाद: पुढील सुनावणीपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक वेशभूषेवर न्यायालयाची बंदी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sc

मुक्तपीठ टीम

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादाची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, तोपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक वेशभूषेत जाण्यावर बंदीही घातली आहे.

 

दरम्यान, कर्नाटकात सुरू असलेला हिजाबचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. वकील आणि दिग्गज काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करून त्याची त्वरित सुनावणी करावी, अशी विनंती केली आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने हिजाब वादाच्या संबंधित याचिकांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांची त्वरित सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

 

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कर्नाटकातील हिजाब वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा उल्लेख केला.
त्यांनी प्रकरण हस्तांतरित करण्याची आणि नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याची विनंती केली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कर्नाटक हिजाब वादाशी संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग करण्याच्या विनंतीवर सरन्यायाधीश रमणा म्हणालो की, ते त्यात लक्ष घालतील.

 

लक्ष ठेवणार, पण उच्च न्यायालयालाही संधी मिळावी!

  • सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हिजाब विवादासंदर्भातील याचिका त्यांच्या न्यायालयात हस्तांतरित करण्याच्या विनंतीवर विचार केला जाईल.
  • सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, कर्नाटक उच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे आणि त्याला सुनावणीची आणि निकालाची संधी मिळाली पाहिजे.

 

काय म्हणाले कपिल सिब्बल?

  • ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची सुनावणी नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर करण्याची विनंती करताना सांगितले की, शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत.
  • मुलींवर दगडफेक केली जात आहे.
  • हा वाद देशभर गाजत आहे. सिब्बल म्हणाले की, मला या प्रकरणावर कोणताही आदेश नको आहे, फक्त याचिका सुनावणीसाठी दाखल करावी अशी इच्छा आहे.
  • यानंतर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही त्यावर लक्ष घालू.
  • दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांनी बुधवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पूर्ण खंडपीठ स्थापन केले.

Tags: HijabKapil Sibbalkarnataka high courtकपिल सिब्बलकर्नाटककर्नाटक उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयहिजाब वाद
Previous Post

करवाढ, दरवाढ नसलेला ठाणे मनपाचा अर्थसंकल्प! अधिकारी सभागृहात, नगरसेवक ऑनलाइन! विरोधक संतप्त!

Next Post

स्टोरीटेलवर ऐका संजय सोनवणी लिखित ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’!

Next Post
Sanjay Sonwani's 'Sambhaji Maharaj and ShahZada Akbar' on Storytel

स्टोरीटेलवर ऐका संजय सोनवणी लिखित ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!