मुक्तपीठ टीम
यावर्षीच्या सुरूवातीला रशिया युक्रेनमध्ये झालेले युद्ध हे सर्वांनाच ज्ञात आहे. या युद्धात अनेकांनी आपला जीव गमावला. परंतु, युक्रेनने हार मानली नाही. रशियाशी सतत युद्ध लढणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी या युद्धात मोठे योगदान आणि पाठिंबा दिला. नुकतेच, त्यांना अमेरिकेच्या आघाडीच्या मासिकाने ‘पर्सन ऑफ द इयर’ २०२२ या वर्षासाठी ‘द स्पिरिट ऑफ द युक्रेन’ म्हणून गौरवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगप्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘टाइम’ने रशियाच्या लष्करी कारवाईचा सामना करताना प्रतिकार करण्याची क्षमता दाखविल्याबद्दल झेलेंस्की यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे. तसेच, अमेरिका युक्रेनला नाटोमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रशियाच्या विरोधात आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या युक्रेनला मदत करत आहे. टाईम मासिकाने शीर्षकासाठी १० लोकांच्या शॉर्टलिस्टमधून झेलेंस्की यांची निवड केली होती.
नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करताना झेलेंस्की यांनी जगात दहशतवादाला जागा नसावी, असे ठणकावून सांगितले होते. ते म्हणाले, ‘युक्रेनियन शांतता सूत्राला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे, मी पुन्हा सांगतो. जगात दहशतीला अजिबात स्थान नसावे.’
युक्रेनच्या युद्धातील वोलोदिमिर झेलेंस्की यांचे प्रयत्म हे प्रशंसनीय!
- २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी कीवमध्ये राहून युद्धाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
- टाइम मासिकाचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थल म्हणाले की, या वर्षीचा निर्णय लक्षात ठेवण्यासारखा होता.
- रशियाने केलेल्या लष्करी कारवाईपासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी केवळ युक्रेनचेच नव्हे तर जगभरातील नागरिकही त्यांच्या देशात पोहोचावेत यासाठी सरकारशी सातत्याने चर्चा करत होते.
- असे मानले जात होते की हे युद्ध फार काळ टिकणार नाही. असे झाले नसले तरी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी त्याचा जोरदार सामना केला आहे.
- युक्रेनने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आणि झेलेंस्की जागतिक स्तरावर एक नेता म्हणून उदयास आले.
खेरसन येथून रशियन सैन्याची माघार
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाशी युद्धात जोरदार लढा दिला आणि रशियाच्या सैन्याने ताब्यात घेतलेली शहरे परत घेतली. याआधी नोव्हेंबरमध्ये रशियाने खेरसनमधून आपले सैन्य मागे घेतले होते, तेव्हा युक्रेनच्या लोकांनी खूप आनंद साजरा केला होता. फेब्रुवारी २०२२मध्ये रशियन आक्रमण झाल्यापासून युक्रेनमधील रशियन हल्ल्यांमुळे जवळपास ३२ हजार नागरी लक्ष्य आणि ७०० हून अधिक गंभीर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.