मुक्तपीठ टीम
संगमनेरमध्ये सोमवारी दंडकारण्य अभियानाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सोहळ्यात राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरातांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम उपस्थित होते. यावेळी थोरात यांनी आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांचं भरभरून कौतूक केलं. एकीकडे थोरात ज्येष्ठत्वाच्या नात्यानं युवा नेत्यांबद्दल कौतुकानं बोलत असताना दुसरीकडे आदित्य ठाकरे कसे मागे राहतील? त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचे दूध आणि साखरे एवढे गोड संबंध आहेत, असं मोकळेपणानं सांगितलं.
आदित्य ठाकरेंनी पर्यावरण खातं मागून घेतलं…
- महाराष्ट्राचं नेतृत्त्व करायचं म्हणजे राज्याच्या ग्रामीण भागाची, तिथल्या नव्या प्रयोगांची ओळख असली पाहिजे म्हणून आदित्य ठाकरेंशींशी चर्चा करायची होती.
- आदित्य ठाकरेंना कोणतं खातं पाहिजे विचारलं होतं, तेव्हा त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन खातं घेतो, असं सांगितलं.
- मुंबई पाहायची म्हणजे काय करायचं?, असा प्रश्न होता.
- आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेचं पर्यटन त्यांनी सुरु केलं.
- रोजगार आणि आर्थिक उत्पन्न आहे.
- पर्यावरणाच्या बाबतीत झाडं, फुलं , पानं फळ यांची आपल्यापेक्षा जास्त माहिती आदित्य ठाकरे यांना आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
- पर्यावरणाचा विषय आहे म्हणल्यावर त्यांना बोलावलं पाहिजे म्हटलं आणि ते यायला तयार झाले, असंही थोरात म्हणाले.
तीर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांनी सुरु केलेल्या पर्यावरण व सजीवसृष्टीच्या रक्षणाकरता दंडकारण्य अभियानाच्या सोळाव्या वर्षाचा आनंद मेळावा आज पिंपारणे (संगमनेर) येथे संपन्न झाला. pic.twitter.com/8mpdyWbbte
— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 31, 2021
आदित्य ठाकरे, विश्वजीत कदम भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्व!
- पंतगराव कदम यांच्या अचानक जाण्यानं विश्वजीत कदम यांच्यावर जबाबदारी आली.
- सुरुवातीला जरा काळजी वाटली , परंतु विश्वजीत कदम यांनी निवडणूक जिंकल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही, असं वाटल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.
- आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांना पुढील काळात देशपातळीवर काम करण्याची जबाबदारी पडेल.
- त्यावेळी देखील ते चांगली जबाबदारी पाडतील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
- दंडकारण्य अभियानाचं आता सोळावं वर्ष आहे.
- ५ वर्षानंतर आपण याच लावलेल्या झाडाखाली कार्यक्रम घेऊ.
- हर्मन हिल ही व्यवस्था करतोय, हे सोप कामं नव्हतं, ५० एकरावर आपण १५७ प्रकारची झाडं लावली आहेत.
दुधात साखर मिसळते तसं एक झालोय!
- संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले की, आता साखरेत ही अनेक प्रकार आलेत.
- कोणी साखर घेतं, कोणी गूळ घेतो मात्र सगळं थोडं थोडं घ्यायच असतं.
- बाळासाहेब थोरात यांच्या दुध संघात गेल्यावर मला कळलं की महाविकास आघाडी म्हणजे दुधात जशी साखर मिसळते तसे आम्ही एक झालो आहोत.