Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलिया सरकारची मान्यता! ऐन दिवाळीत WHOकडूनही गोड बातमी येणार?

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
aurtalian Govt

मुक्तपीठ टीम

ऑस्ट्रेलियन सरकारने मान्यताप्राप्त लसींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश केला आहे. एका मोठ्या देशाच्या मान्यतेनंतर आता डोळे लागलेत ते तीन नोव्हेंबरच्या WHOबैठकीकडे लागले आहेत. त्या बैठकीत नव्याने आलेल्या माहितीचा अभ्यास करून मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीत WHO गोड बातमी देईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अनेकांचे रखडलेले परदेश दौरे शक्य होतील.

 

भारतात बनवलेल्या कोवॅक्सिन या कोरोना लसीला जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ती लस घेऊन लसवंत झालेल्या कोट्यवधी भारतीयांचा जीव टांगणीवर आहे. त्यातही लाखोंना काही प्रमुख देशांमध्ये जाणं शक्य नसल्यानं ते मोठ्या अडचणीत आले आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी दिलासा देणारी ही मोठी बातमी आहे.

 

ऑस्ट्रिलियाकडून दिलासा!

  • भारत बायोटेकने बनवलेल्या कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियाने मान्यता दिली आहे.
  • ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’फेरेल यांनी ही चांगली बातमी दिली आहे.
  • कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियन सरकारने मान्यता दिल्यामुळे आता WHOकडूनही लवकरच हिरवा कंदिल दाखवला जाण्याची शक्यता आहे.

कोवॅक्सिनला मंजुरीसाठी दीर्घ प्रतिक्षा!

  • WHOकडून कोवॅक्सिनला मान्यतेसाठी अनेक महिने प्रतीक्षा केली जात आहे.
  • या लसीला मान्यता देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आणखी काही माहिती मागवली आहे.
  • आणखी काही माहिती आवश्यक आहे, त्याआधारेच या लसीच्या वापरास मान्यता दिली जाऊ शकते.
  • खरंतर २६ ऑक्टोबरच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत लसीला मंजुरी मिळणे अपेक्षित होते.
  • आता ३ नोव्हेंबरला WHOची बैठक होणार आहे. या बैठकीत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी मिळू शकते.
  • याच वर्षी १९ एप्रिल रोजी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता.
  • ही लस भारत बायोटेकने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने विकसित केली आहे.

 

ऑस्ट्रेलियात कोणत्या लसींना मान्यता?

  • कोविशील्ड लसीला ऑस्ट्रेलियन सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
  • त्या बरोबरच फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, सिनोव्हॅक, सिनोफार्म आणि आता भारत बायोटेक यांच्या लसींनाही मान्यता दिली आहे.

Tags: Australian Govtbharat biotechcovaxinWHOऑस्ट्रेलियन सरकारकोवॅक्सिनभारत बायोटेक
Previous Post

‘दूध – साखरेसारखी गोडी’पासून देशाच्या नेतृत्वापर्यंत! नगरच्या दंडकारण्य अभियानात ठाकरे-कदम-थोरांतांनी उधळले शब्दसुमन!

Next Post

कंगनाचा अंदमान दौरा…स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचं दर्शन…पुन्हा राजकारण प्रवेशाची चर्चा

Next Post
kangana's political entry

कंगनाचा अंदमान दौरा...स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचं दर्शन...पुन्हा राजकारण प्रवेशाची चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!