मुक्तपीठ टीम
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताने दमदार खेळी करत इंग्लंडशी १-१ अशी बरोबरी केली. पण विजयानंतरही भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मोठा धक्का म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहलीवर बंदी घातली जाण्याची शक्यता.
सामन्यात काय घडले
- दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीकडून नकळत काही चुका झाल्या. त्याचबरोबर आपल्या चुका झाल्या असूनही कोहलीने पंचांशी वाद घातल्याचे पाहायला मिळाले.
- तिसऱ्या पंचांच्या एका निर्णयावर कोहलीने सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली. तसेच मैदानातील पंचांबरोबर हुज्जत घातल्याचे पाहायला मिळाले.
- सामन्यादरम्यान विराट खेळपट्टीच्या डेंजर झोनमध्ये आला होता. यावेळी पंचाने त्याला वॉर्निंग दिली होती. मात्र, तेव्हाही त्यांने पंचांशी मैदानात हुज्जत घातली.
- इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी विराट कोहलीच्या वर्तनावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर पंचांनी किंवा इंग्लंडच्या खेळाडूंनी कोहलीची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली, तर अशी बंदीची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दमदार विजय
- दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी भारताने इंग्लंड समोर ४८२ धावांचे आव्हान ठेवले होते.
- या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ १६४ धावांवर बाध झाला.
- अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली साथ यांच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला.
- सामन्यात आठ बळी घेणारा आणि दमदार शतक झळकावणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर ठरला.